पावन महागणपती देवस्थान येथे सोहळ्यानिमित्त ह भ प प्रदीप महाराज वाघमोडे यांची कीर्तन रुपी सेवा मोठ्या उत्साहात संपन्न.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण):- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव माका पाचुंदा मलहिवरा परिसरात असलेले पावन महागणपती देवस्थान येथे दररोज धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सातव्या दिवसानिमित्त ह भ प प्रदीप महाराज वाघमोडे यांचे कीर्तन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी अनेक भाविकांनी या कीर्तन सेवेचा लाभ घेतला महाराजांनी बोलताना म्हणाले की आपण विघ्नहर्तेची देवता श्री गणपतीची पूजा करत आहोत नक्कीच आपली सर्व मनोकामना पुरी होईल भगवंत सर्व चराचरामध्ये आहे तो आपण सर्वांमध्ये पाहून माणुसकी जपावी हा परिसर निसर्गरम्य वातावरणात असून काही दिवसांनी या गणपतीला वडाचा गणपती म्हणून ओळखले जाईल व पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्रातून भाविक येत जातील म्हणून सर्वांनी या देवतेला प्रथम स्थानी ठेवून पूजा करावी मानवाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा अनेक विषयावर त्यांनी कीर्तन रुपी सेवा दिली व मी आज महंत गुरुवर्य शांती ब्रह्म भास्करगिरी महाराज यांच्या पदपरश्याने पावन झालेली ही नेवासा भूमी आहे व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने आम्ही संत सेवक धर्माचे कार्य करत आहोत अशा अनेक विषयावर प्रबोधन करत त्यांनी आपली कीर्तन रुपी सेवा दिली.
या कीर्तन सोहळ्याला ह भ प सुखदेव महाराज मुंगसे व पाचुंदा माका देडगाव वांगी महालक्ष्मी हिवरा परिसरातील भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किर्तन सोहळ्यानंतर महा रुपी आरतीचे आयोजन करण्यात आले होते या आरतीसाठी हजारो भाविक उपस्थित होते तर भक्ती भावाने आरतीचा आनंद घेतला यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.