नेवासा पाटबंधारे उपविभागीय वितरिका 5 चे रब्बी आवर्तन पूर्ण .

नेवासा पाटबंधारे उपविभागीय वितरिका 5 चे  रब्बी आवर्तन पूर्ण .

नेवासा तालुक्यातील म्हासले ,पिचडगाव, बाभुळखेडे ,सलबतपुर ,गोंडेगाव या भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण .

        मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून डी वाय 5 ची रब्बीचे सिंचन 20 जानेवारी पासून सुरु झाली होते. शेवटच्या भागातील शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने पाणी मिळाल्याने १०० % सिंचनाचे उद्दिष्ट पूर्ण झाले.

        महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री आमदार शंकराव गडाख यांनी कुशल नियोजन करून पाटबंधारे विभागाचे उत्कृष्ट व्यवस्थापन केलं म्हणून टेलच्या भागाला पूर्ण दाबाने पाणी मिळाले .या पाण्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. व शेतकऱ्यांची शेती आनंदाने फुलू लागली. अनेक गावांचा पिण्याचा पाण्याचाही प्रश्न मार्गी लागला.

      योग्य वेळेत पाटपाणी मिळालेली शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले .सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे .

         नामदार शंकरराव गडाख यांनी निवडणुकीपूर्वी जनतेला शब्द दिला होता मी जर आमदार झालो तर पहिला प्रश्न विधानसभेत शेतकऱ्यासाठी मांडील व शेतकऱ्याचे पिकांचे एकही पान वाळू देणार नाही असे आश्वासन दिले होते .त्यांनी या कामाच्या रुपानं शब्द पाळला म्हणून सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे .Dy 5 वरील पाचही पाणीवापर संस्थांना पूर्ण क्षमतेने व पूर्ण दाबाने पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

      या कामासाठी मुळा पाटबंधारे उपविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी उपविभागीय अभियंता श्री. संजय हेंबाडे ,शाखाधिकारी श्री. डी एन शिवगण ,कालवा निरीक्षक श्री .आर जी ससाने, तसेच सह निवृत्ती हजारे ,यांनी वेळोवेळी लक्ष देत शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचण्याचे काम केले.