महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये माजी कृषी अभियंत्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन .

महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये माजी कृषी अभियंत्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये माजी कृषि अभियंत्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन*

*राहुरी विद्यापीठ, दि. 20 डिसेंबर, 2023*

             महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन दि. 23 व 24 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आले आहे. देश व विदेशातील विविध क्षेत्रात काम करत असलेल्या कृषि अभियंत्याना एकत्र आणुन एकमेकांशी संवाद घडविण्याचा हा उपक्रम आहे. असा उपक्रम दर चार वर्षांनी घडवुन आणला जातो. या वर्षी तो डिसेंबरच्या 23 व 24 तारखेला कृषि विद्यापीठात आयोजीत करण्यात आला आहे.

              यामध्ये विविध क्षेत्रातील कृषि अभियंते आपले विचार आणि प्रगती या विषयी एकमेकांशी चर्चा करणार आहे. त्यामध्ये अनुभव आणि ज्ञानाची देवाण घेवाण होणार आहे. सर्व माजी कृषि अभियांत्याना विनंती करण्यात येते की त्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपला आनंद व्दिगुनित करावा. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील असणार आहेत. यामध्ये उद्योजक कृषि अभियंत्याच्या निर्देशिकेचे प्रकाशन होणार आहे. तसेच नोकरी व व्यवसाय संधी यावर ही चर्चा होणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले आहे.