कर्जबाजारीपणाला कंटाळून राहुरी येथील तरुणाची श्रीरामपूर येथे आत्महत्या.
प्रतिनिधी:- राहुरी
तीन पतसंस्थांच्या कर्जाला कंटाळून राहुरी येथील तरुणाने श्रीरामपूर येथे मोरगे वस्ती परिसरात आपल्या राहत असलेल्या भाडोत्री खोलीत गळफास घेऊन दि.८ एप्रिल रोजी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
चंद्रकांत सुभाष तनपुरे वय ३२ असे या तरुणाचे नाव आहे. एका खाजगी नोकरीनिमित्त हा तरुण श्रीरामपूर याठिकाणी ये-जा करीत असे. किमान तीन-चार दिवसांपूर्वी या तरुणाने आत्महत्या केल्याचा संशय पोलीस सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे
मयत तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी दोन सुसाइट नोट लिहून ठेवलेले आहेत. व त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे
या तरुणाचे मोबाईल मधील सर्व डाटा डिलीट केल्याचे समजते आहे.
काल दि ९ एप्रिल: रोजी राहुरी येथे गणपती घाट स्मशानभूमीत या तरुणाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.
तरुण पिढीतील आत्महत्येचे प्रमाण हे अधिकाधिक वाढत आहे, ही मोठी चिंतेची गोष्ट आहे
सर्व गोष्टींना आत्महत्या हाच पर्याय नसतो. हे तरुण पिढीने समजून घेणे आवश्यक आहे
शालेय विद्यार्थ्यांच्या नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या, कर्जबाजारीपणाला कंटाळून होणाऱ्या आत्महत्या, विवाह जमत नाही म्हणून होणाऱ्या आत्महत्या, बेरोजगारी पणा मुळे होणाऱ्या आत्महत्या, एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या आत्महत्या अशा एक ना अनेक कारणातून आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे
याला जबाबदार कोण? यासाठी कुटुंब व्यवस्था समाजव्यवस्था या गोष्टी जबाबदार आहेत, एकमेकांना समजून घेण्याची कुवत कमी झाल्यामुळे या गोष्टी वाढत चाललेले आहेत. केवळ मोबाईल हेच आपले विश्व मानणारी संकुचित मनोवृत्तीची पिढी तयार झालेले आहे.
कुठेतरी बदल घडवून आपला पाल्य किंवा आपला मित्र यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याचे मानसिक परिवर्तन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
.........