अवेळी वाजणाऱ्या भोंग्यांच्या आवाजावर निर्बंध घाला अन्यथा हिंदू समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन -देवेंद्र लांबे .
अवेळी वाजणाऱ्या भोंग्यांच्या आवाजावर निर्बध घाला अन्यथा हिंदू समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन – देवेंद्र लांबे
– राहुरी येथे अखंड हिंदू समाज यांच्यावतीने पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात बंगालदेश येथिल काही लोक राहुरी कारखाना परिसर तथा तालुक्यातील इतर ठिकाणी घुसखोरी केल्याचे प्रसार माध्यमांच्या माध्यमातून समोर येत आहे.सबंधित ठिकाणांवर ओळखपत्राची चौकशी करून अनिवासी भारतीय आढळल्यास कारवाई करण्यात यावी.मु.पो.मस्साजोग ता.केज जि.बीड येथिल संतोष देशमुख या तरुणाची अमानुष पणे छळ करून हत्या करण्यात आलेली आहे.सबंधित हत्याकांडातील आरोपींचा तात्काळ शोध घेवून कठोर शासन करण्यात यावे.परभणी जिल्ह्यात भारतीय संविधानाची विटंबना करणाऱ्या माथेफिरूवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.राहुरी तालुक्यात वेळेचे कुठलेही बंधन न पाळता नागरिकांना कर्णकर्कश (जास्तीच्या आवाजाच्या) भोग्यांवर तात्काळ कारवाई करून शासनाच्या नियमानुसार आवजाची मर्यादा घालून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रसंगी अखंड हिंदू समाजाच्या वतीने देवेंद्र लांबे पा.म्हणाले कि ,हिंदू समाज बहुसंख्य असून देखील असुरक्षित असल्याची भावना निर्माण होत आहे.बांगलादेशमध्ये हिंदुंवर हल्ले होत आहे.बांगलादेशा विषयी संपूर्ण जगामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.परंतु राहुरी तालुक्यासाख्या ग्रामीण भागात बांगलादेशातील लोकांकडून घुसखोरी केल्याचे प्रसारमाध्यमांवर येत आहे.याची दखल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.तसेच बीड येथील तरुण संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली या हत्याकांडातील आरोपींवर तत्काळ कारवाई होणे गरजेचे आहे.परभणी येथील संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी.त्याचबरोबर राहुरी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अवेळी मोठ्या आवाजात कर्णकष्य भोंगे वाजविले जातात.या आवाजामुळे लहान बालके , वयोवृद्ध नागरिक,विध्यार्थी यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.मान.न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाचे जे नियम घालून दिलेले आहेत.त्यानुसार निर्बंध घालून आवाजाची मर्यादा घालून भोंग्यांचा आवाज कमी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.यावेळ श्री.लांबे यांनी सांगितले आहे कि प्रातिनिधिक स्वरुपात प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे ,वरील सर्व मागण्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा अखंड हिंदू समाजाच्या वतीने प्रशासनास कुठलीही पूर्व कल्पना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा अखंड हिंदू समाजाच्यावतीने देण्यात आलेला आहे.या प्रसंगी सचिन म्हसे,सतिश घुले,रवींद्र कदम,मधुकर घाडगे,मेजर नामदेव वांढेकर,अशोक तनपुरे,विनायक बाठे,राजेंद्र लबडे,अविनाश क्षीरसागर,दिपक जाधव,अनिल आढाव,विजय पटारे,प्रदीप गाडेकर,राजेंद्र खोजे,सदानंद शिरसाठ,सुनील निमसे,महेंद्र शेळके,सागर ताकटे आदी उपस्थित होते.