विश्व माऊली अध्यात्मिक गुरुकुल उंबरे येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा ,कलशारोहन व ध्वजारोहन सोहळ्याचे आयोजन .
राहुरी तालुक्यातील उंबरे गावातील विश्व माऊली अध्यात्मिक गुरुकुलामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .त्यामध्ये प्रामुख्याने श्री विठ्ठल रुक्मिणी ,श्री ज्ञानेश्वर महाराज ,श्री तुकाराम महाराज ,श्री सद्गुरू जोग महाराज व सद्गुरु रघुनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .दि .11/052022 रोजी दुपारी 04 वाजता होम हवन पूजा विधि संपन्न झाला आहे तसेच दि .12/05/2022 रोजी सकाळी 08 वाजता मूर्ती मिरवणूक सोहळा व होमहवन पूजा विधी सोहळा संपन्न करण्यात आला आहे . शुक्रवार दि .03/05/2022 रोजी पंचदिनी कीर्तन महोत्सवास सुरुवात होणार आहे .
विश्व माऊली अध्यात्मिक गुरुकुल येथे पाच दिवसीय कीर्तन महोत्सव सायंकाळी 07 ते 09 यावेळेत होणार आहे तसेच किर्तन संपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .या कीर्तन महोत्सव मध्ये ह.भ.प .युवराज काका देशमुख (आळंदी देवाची ), ह .भ .प .आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड ), ह.भ.प.जगन्नाथ महाराज पाटील (ठाणे ), ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर आणि काल्याचे किर्तन ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक यांच्या सुश्राव्य वाणीने संपन्न होणार आहे .
विश्व माऊली अध्यात्मिक गुरुकुल येथे ( दि.14/05/2022 ) रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा ही प.पु. गुरुवर्य शांतीब्रम्ह ह . भ प .मारोती बाबा कु-हेकर , ह .भ प .महंत भास्करगिरीजी महाराज महाराज , प.पु. महंत ह.भ.प.आदिनाथ शास्त्री बाबा , प पु . ह.भ.प.पुंडलिक महाराज जंगले शास्त्री व प.पु. ह.भ.प.विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे .या वेळी गुरुवर्य शांतिब्रह्म ह.भ.प .मारोती बाबा कु-हेकर यांचे सकाळी 10 ते 12या वेळेत कीर्तन सेवा संपन्न होणार आहे .
विश्व माऊली अध्यात्मिक गुरुकुलचे अध्यक्ष ह.भ.प .आदिनाथ महाराज दुशिंग यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन होत असून राहुरी तालुक्यातील व उंबरे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .