भाजपला मोठा धक्का : धनगर समाजाचे नेते दत्ताभाऊ खेमनर यांचा शिवसेनेत प्रवेश
भाजपला मोठा धक्का : धनगर समाजाचे नेते दत्ताभाऊ खेमनर यांचा शिवसेनेत प्रवेश
अहिल्यानगर : प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.
उत्तर नगर जिल्ह्यातून भाजपला मोठा धक्का बसला आहे. गेली १५ वर्षे भाजपात कार्यरत राहून पक्षवाढ व धर्मरक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारे भाजपचे माजी उत्तर नगर जिल्हा सचिव तसेच राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांचे खंदे समर्थक दत्ताभाऊ खेमनर यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे.
दत्ताभाऊ खेमनर यांनी आपल्या धनगर समाज बांधवांसह मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री व शिंदे सेनेचे प्रमुख एकनाथजी शिंदे, तसेच शिवसेना सचिव श्रीराम दादा रेपाळे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने उत्तर नगर जिल्ह्यात सेनेला नवी ऊर्जा मिळाल्याचे बोलले जात आहे.
धनगर समाजातील त्यांच्या प्रभावामुळे आगामी काळात उत्तर नगर जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद आणखी भक्कम होणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. दत्ताभाऊ खेमनर यांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून जिल्ह्यातील राजकारणाला नवा कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपच्या संघटनात यामुळे मोठे खिंडार पडल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.









