अहमदनगर मनमाड रोड चे काम निकृष्ठ पद्धतीने चालु ठेकेदार व शासकिय इंजिनियर चा मिळून मिसळून कार्यक्रम - शासकिय अधिकारी इजिनियर कधीच रोडच्या साईटवर नाहीत
सध्या सुरू असलेले संपूर्ण रोडचे काम अतिषय निकृष्ठ दर्जाचे सूरू आहे या रोडच्या कामावर माती वापरली जाते तसेच पाणी कमी प्रमाणात वापरतात रोलींग ही व्यवस्थीत नाही.
P.W.D.चे अधिकारी केव्हाच साईटवर काम चेक करतांना दिसत नाही या रोडच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सूरू आहे या भ्रष्टाचारामागे कोणाचा हात लोकप्रतिनिधी सुद्धा या कामाकडे दुर्लक्ष करतात शासकिय पैशाचा मोठ्या प्रमाणात अपहार करण्याचे काम सुरू आहे शासनाचे अधिकारी निविदा प्रमाणे कामाचा दर्जा व मोजमाप करूनच काम तपासून घेणे गरजेचे आहे.
रोडवर पावसाळ्या मध्ये पाणी साठणार नाही तसेच डांबराचा लियर देखील कमी प्रति चा वापरला जातो त्यामध्ये डांबरा एवजी दुसरेच एकदम साध्या प्रकारचे काळे ऑईल मिस्त्रीत क्रस्ट वापरतात रोडचे काम झाल्यानंतर रोड एक महिना सुद्धा निट रहात नाही या सर्वास कारणीभूत आपलाच ठेकेदार -अधिकारी आपन ज्या रोडवर दररोज चालतो त्या रोडच्या कामाकडे जर जनतेने दुर्लक्ष केले तर यामाघे आपलाच तोटा आहे.
सर्व सामान्य जनतेला विनंती आहे की रोडचे कामे जिथे कुठे चालु असतील फक्त ५ मिनिट आपली गाडी साईटला दाबून उभी करून त्या कामाची विचारणा करा नंतर येणारी वेळ टाळा