कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राहुरीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन .
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतिने राहुरीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन
आर आर जाधव / राहुरी विद्यापीठ .
कृषी उतपन्न बाजार समितीच्या वतिने भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समीतीचे सभापती लोकनेते अरुण तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे .स्पर्धेच्या युगात शेती व्यावसाय आधुनिक पद्धतीने केला तरच शेतकरी टिकेल वारंवार पडणारा दुष्काळ ,हवामानामध्ये सतत होणारे बदल , अवकाळी पाऊस , यामुळे शेती व्यावसाय अत्यंत धोक्यात आला आहे . सर्व दृष्ट चक्रातुन आपला शेतकरी वाचला पाहीजे या उद्देशाने आमच्या संकल्पनेतुन व कृषी उपन्न बाजार समितीच्या वतीने दि १४/ २ / २०२२ ते १८ /४ / २०२२ दरम्यान नगर -मनमाड महामार्गां लगत असलेला वाय एम सी ए मैदान येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे .
या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग , सहकार व पणन विभाग हवामानानुसार शेतीचे मार्गदर्शन तसेच नविन कृषी औजारे , हार्वेस्टींग यंत्रे , जैविक किटक नाशके , डेअरी व्यवस्थापन ,मत्स्यव्यवसाय , अधुनीक कुकुट पालन , शेळी पालन विषयी माहीती , चर्चासत्रे , विविध कृषी तज्ञाची मार्गदर्शन होणार आहेत तसेच कृषी मार्गदर्शन पुस्तके , ठिबक सिंचन नव नविन बियाणाची माहीती , सोलर उपकरणे , अशा अनेक उपकरणांची माहीती राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे .
तसेच गृह उपयोगी वस्तु , बचत गट खाद्य पदार्थाचे स्टॉल ह्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत या प्रदर्शनामध्ये परराज्यातुन पशुधन उपलब्ध राहाणार आहे .कर्नाटक राज्यातुन खास आकर्षण म्हणुन दिड टन वजनी रेडा प्रदर्शनास भेटी देणाऱ्या शेतकऱ्यांना पहावयास मिळणार आहे या प्रदर्शनात २०० पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात येणार असुन वाबळेज इव्हेंटस हे या प्रदशनाचे नियोजन करणार आहेत .
व्यावसायिकांनी आपली उपकरणे शेतकऱ्यां पर्यंत पोहचविण्यासाठी जास्तीत जास्त कंपण्यानी सहभागी व्हावे तसेच प्रदर्शनामध्ये सहभाग घेण्यासाठी ९४२३३८६३२६ , ९८९०८६९७६ या भ्रमण ध्वनीवर क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सभापती श्री तनपुरे यांनी केले आहे .या पत्रकार परिषदेस तारा चंद पाटील तनपुरे , बाबा कल्हापूरे , वाबळे इव्हेंट्स चे अजय वाबळे , विजय शेलार , सह कृ .उ.बा. समितिचे संचालक कार्यकर्ते उपस्थीत होते .