जेथे जावे तेथे ,कपाळ सरीसे ll वेदांतचार्य ह भ प पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांची पानेगाव येथे किर्तन सेवा संपन्न.

प्रतिनिधी :-खेडले परमानंद, नेवासा

जेथे जावे तेथे ,कपाळ सरीसे ।l

वेदांतचार्य ह भ प पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांची काल पानेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह तील कीर्तन सेवेचे पाचवे पुष्प होते .या किर्तन सेवेसाठी त्यांनी हा अभंग घेतला होता.

          महाराजांनी भाग्य व संत संग या विषयावर भाविकांना अनमोल असे मार्गदर्शन केले.

भाग्य पेक्षा जास्त मिळू शकत नाही, ना तुमच्या भागातले कुणी हिराहू शकते. जसे तुमचे पूर्वपुण्य असेल तसे तुमचे भाग्य असते.

           धन, दारा ,पुत्र , जन

धन म्हणजे पैसा, दारा म्हणजे पत्नी, पुत्र म्हणजे अपत्य जन म्हणजे जन सामान्यातले तुमचे व्यक्तिमत्व, मानसन्मान या सर्व गोष्टी तुमच्या भाग्यशी निगडीत असतात. आणि जशे कर्म असते तसे भाग्य असते.

      आणि तुमचे भाग्य उजळायला संत संग हा अतिशय महत्त्वपूर्ण असतो , संतांचा सहवास लाभल्यानंतर दुर्भाग्याचे भाग्यात रूपांतर होते. 

    अशा दिव्य विचारांनी हरिभक्त परायण वेदांताचार्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांनी भाविकांना प्रबोधन केले.

          अखंड हरिनाम सप्ताह निमित्त पानेगाव ग्रामस्थांच्यावतीने दैनिक स्वरूपात कीर्तन सेवा संपल्यानंतर सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.पारायण कमिटी मध्ये भाऊसाहेब काकडे,संजय जंगले,नानासाहेब दादा जंगले,व्दारकनाथ चिंधे, दत्तात्रय घोलप,मच्छिंद्र जंगले,ह.भ.प ज्ञानदेव गुडधे महाराज ,सर्व तरूण मंडळ यांनी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे नियोजन केलेले आहे.