75 व्या स्वातंत्र दिनाचे अमृत महोत्सव दिवशी वर्ड ऑफ जिजस मिनिस्ट्री अशोकनगर चर्चच्या उपासनेची सुरुवात राष्ट्रगीताने. .! !
श्रीरामपूर :---
श्रीरामपूर लगत असणाऱ्या अशोकनगर या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ड ऑफ जीजस मिनिस्ट्री चर्चच्या उपासनेची सुरुवात भारताचा राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर राष्ट्रगीताने व ध्वजगीताने करण्यात आली.
वर्ड ऑफ जीजस मिनिस्ट्री अशोकनगर या ठिकाणी दर रविवारी चर्चची उपासना होत असते परंतु ही उपासना रविवारी न घेता सोमवार दिनांक 15 ऑगस्ट या रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याने या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी चर्च ची उपासना सोमवारी सकाळी आठ वाजता घेण्यात आली. चर्च ची उपासना सुरु होण्याअगोदर सकाळी आठ वाजता चर्चमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने व नंतर अनुष्का सावंत हिने ध्वजगीत गायल्या नंतर चर्चच्या उपासनेची सुरुवात करण्यात आली. चर्च प्रमुख पास्टर पॉल बनकर ,सहाय्यक पास्टर प्रकाश वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण यांच्या करण्यात आले.ध्वजारोहण केल्यानंतर चर्च मध्ये आलेल्या सर्व सदस्यांनी एका स्वरात राष्ट्रगीत म्हणून भारत माता की जय. . वंदे मातरम च्या घोषणा दिल्या नंतर ध्वजगीत गायल्यानंतर चर्चच्या उपासनेला सुरुवात करण्यात आली.आपल्या उपासनेच्या उपदेशामध्ये पास्टर प्रकाश वाघ यांनी भारत देशासाठी बलिदान केलेले सैनिक ,पोलीस, राजकीय व्यक्ती, आणि देशासाठी बलिदान झालेले प्रत्येक व्यक्ती विषयीचा उपदेश उपासनेत केला व भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी भारत देशाने फार मोठा संघर्ष केला यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर चर्च चे डॉक्टर प्रवीणराजे शिंदे यांनी देशासाठी बलिदान झालेले सैनिक, पोलीसदल यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना केली. चर्च मध्ये तिरंगी रंगाचे फुगे लावून आकर्षक डेकोरेशन करण्यात आले होते. उपासने करिता चर्च सदस्या व्यतिरिक्त लहान बालके ,वयोवृद्ध व्यक्ती, तरुण-तरुणी ,तसेच गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.उपासने नंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना व चर्च सभासदांना फराळ व नाष्ट्याचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ब्रदर अशोक बारसे , ब्रदर अभिषेक शिंदे , प्रणवराज शिंदे, प्रसन्नित शिंदे यांनी परिश्रम घेतले.तसेच ब्रदर फिलिप बारसे, ब्रदर जाधव, ब्रदर शेलार,भाऊसाहेब सावंत, रवींद्र अंकुश ,विराज अंकुश,श्रीमती सुनंदा शिंदे ,श्रीमती सकुबाई सावंत,सुरेखा बारसे , श्रीमती सुमन बारसे ,सिस्टर रेचल बारसे, सिस्टर अनिता शिंदे,संध्या शिंदे, सिस्टर वर्षां बारसे, रिया अंकुश आदीसह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती होती.