सोनईच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा तुटवडा वैद्यकीय अधिकारी अनुपस्थितीत.
सोनईच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा तुटवडा वैद्यकीय अधिकारी अनुपस्थितीत. सोनई /प्रतिनिधी / दि 22 सोनई येथे मोठे ग्रामीण रुग्णालय असून येथे सर्वच विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता दिसते येथील वैद्यकीय अधिकारी कधीच वेळेवर रुग्णालयात उपस्थित नसतात सर्व कामकाज कॉन्ट्रॅक्ट बेस वरील डॉक्टर पाहतात तर या रुग्णालयातील लॅब केमिस्ट आरोग्य सेवक फार्मासिस्ट एल एच व्ही सेवक व इतर पदे रिक्त आहेत त्याचबरोबर सोनई येथील उपकेंद्रात आरोग्य सेवक नाही गणेश वाडी, करजगाव, शिंगणापूर, लोहगाव या ठिकाणी आरोग्य सेवक व आरोग्य सेविका नाहीत कुठल्याही उप आरोग्य केंद्रात लॅब टेक्निशियन नाहीत निकाल येथे कॉन्ट्रॅक्ट बेस वरील डॉक्टर यांनी दिलेल्या गोळ्या व औषधे रुग्णालयात शिल्लक नसल्याने येणाऱ्या गरीब पेशंटला खाजगी मेडिकल मधून महागडी औषधे घ्यावे लागतात येथे सुसज्ज रुग्णालय असून सर्व सुविधा उपलब्ध असताना त्याला हाताळणारे कर्मचारी येथे नसल्याने या रुग्णालयाची इमारत शोभेची वस्तू बनली आहे गरीब रुग्ण तेथे येतात मात्र तेथे डॉक्टरच उपस्थित नसल्याने कॉन्ट्रॅक्ट बेस वरील डॉक्टरच्या मार्फत गोळ्या घेऊन जातात मात्र योग्य उपचार होत नसल्याने साथीच्या आजारांने डोके वर काढले आहे सर्दी खोकला ताप याचेच सर्वात जास्त पेशंट असताना खोकल्याचे औषध खोकल्याचे औषध शिल्लक नसल्याचे सांगितले जाते त्यामुळे पर्यायाने रुग्णांना खाजगी मेडिकल मधून खोकल्याचे औषध घ्यावे लागते गेल्या तीन ते चार महिन्यापासून खोकल्याचे औषध शिल्लक नाही मात्र इतर ग्रामीण रुग्णालयात हे औषध मिळते मात्र सोनई मध्ये का नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे इतके मोठे रुग्णालय असून सुद्धा सर्व सुसज्ज यंत्रसामुग्री असताना सुद्धा मनुष्यबळ अभावी हे रुग्णालय शोभेची वस्तू बनली आहे याची वरिष्ठ अधिकारी आणि दखल घेण्याची गरज आहे गेल्या काही दिवसापूर्वी डेंगू सदृश्य आजाराने एक शाळकरी मुलगी दगावली होती मात्र तरीही जिल्हा आरोग्य यंत्रणेचे डोळे उघडेना पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने व औषधे नसल्याने हाय ते कर्मचारी हातबल झालेली दिसून येतात हे रुग्णालय म्हणजे असून अडचण नसून कोळंबा म्हणण्याची वेळ सोनई करा वर आली आहे सर्वसामान्य गरीब रुग्ण या रुग्णालयात जातो मात्र या रुग्णालयात त्याला उपचार मिळत नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे डॉक्टर मिळाले तर औषधे शिल्लक नसतात त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने यात लक्ष घालण्याची गरज आहे.
आरोग्य केंद्राच्या नावाखाली माय लाईफस्टाईल या खाजगी कंपनीचे येथील कर्मचारी काम जास्त करत असेल पेशंटला बघण्यासाठी त्यांना वेळ मिळत नसल्याचे चित्र पाहावयास मिळते येथे या कर्मचाऱ्यांनी या कंपनीचा गोरख धंदा सुरू केला असेल रुग्णालयाचे कमी आणि कंपनीचे जास्त काम बघितले जाते याची दखल कोणी घेणार आहे का असा संवाद जनतेमध्ये विचारला जातो आहे.
सोनई आरोग्य केंद्र असून नसल्यासारखे आहे या आरोग्य केंद्रात माणूस मेला तरी चालेल मात्र आशा सुपरवायझरमार्फत या लाईफ लाईन खाजगी कंपनीचे काम चालले पाहिजे अशी परिस्थिती आरोग्य केंद्राची आहे यामध्ये आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे समजते याबाबत लवकरच आरोग्य मंत्री यांना निवेदन पाठवून लक्ष घालण्याची विनंती करणार आहोत ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र हेच आधार वाटते मात्र त्यांच्याकडूनच गोरगरीब जनतेची लुबाडणूक केली जात आहे ही शोकांतिका आहे. अनिल बाबासाहेब निमसे. सामाजिक कार्यकर्ते सोनई