घोडेगाव शनीचौकात तीन दिवसांपासुन रोज ट्रॅफिक जाम . बेशिस्त वाहन चालक हतबल पोलीस अशी अवस्था.
घोडेगाव शनीचौकात तीन दिवसांपासुन रोज ट्रॅफिक जाम .
बेशिस्त वाहन चालक हतबल पोलीस अशी अवस्था.
घोडेगाव (वार्ताहर) दिवाळी सुट्टी निमित्ताने नगर छ्त्रपती संभाजी नगर राजमार्गावरील घोडेगाव येथील शनीचौकात शुक्रवार पासुन रोज सकाळी दहा ते सायं आठ वाजे पर्यंत ट्रॅफिक जाम होत आहे.
चौपदरी महामार्ग असुन तो अपुरा पडुन वाहतुकीचा खोळंबा होत आहे
.
शनीचौकात नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गाला राहुरी शेवगाव हा मार्ग छेदुन जातो. दोन्ही ही मार्गावर सुट्टीमुळे वाहनांची कोंडी होत आहे.त्यात साखर कारखाने चालु असल्याने ऊस वाहतुक चालु झाली. काही उस वाहतुकीचे दोन तीन ट्रेलर,जुगार,बैलगाड्या यामुळे रस्ता पार करणे ,वाहन ओलांडून पुढे जाणे धोक्याचे ठरते आहे.
सोनई पोलीस स्टेशन कर्मचारी वाहतुक सुरळीत करण्यास प्रयत्न करत होते . परंतु बेशिस्त चारचाकी वाहने,दुचाकी चालक मनमानी करत असल्याने वाहतुक वारंवार ठप्प होत होती. दुपदरी मार्गावर चार चार लाईन करत अडथळा आणत होते.
महामार्गावर चार दुतर्फा चार किमी पर्यंत तर राहुरी शेवगाव रोडवर दोन किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.वाहने रस्त्याच्या खालून जात असल्याने धुळीचे लोट उडत होते. वाहनांच्या कर्ण कर्कश हाॅर्नचा आवाजही वाढल्याने . ध्वनी व वायु प्रदुषणात भर पडली.
प्रवाश्यांची संख्या वाढल्याने शनी चौकात ही प्रवाशी वाहनांची वाट पाहताना उन्हात उभे दिसत होते. बस स्थानकावरून गाडी थांबवली तर प्रवासी इतरत्र थांबणार नाहीत. चालकाने बस बस स्थानकावरच थांबवावी अशीही प्रवासी मागणी करत आहेत.
घोडेगाव येथे शुक्रवार बाजार, आठवड्यात तीन दिवस कांदा मार्केट, शिंगणापूर साठी शनिवारी रविवारी गर्दी हि ठरलेली .आता शनीचौक,मार्केट गेट समोर वाहतुक सिग्नल बसवावेत अशी मागणी प्रवाशी,नागरिक, व्यावसायीक करत आहेत.