वडनेर येथील शेतकऱ्याचा शेतीच्या , वादातून भावनेच केला भावाचा घात
वडनेर गावातील संदीप गेठे यांचा विहिरीत मृतदेह. सख्या भावानेच विहिरीत ढकलून दिल्याची माहिती समजली जगण भीमजी देठे असे आरोपीचे नाव आहे.
राहुरी ता प्रती -

डॉ देवेंद्र शिंदे
राहुरी तालुक्यातील वडनेर गावात संदीप भीमजी गेठे वय ४३ वर्षे या तरुणाचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून एकच खळबळ उडाली होती . गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या संदीपचा मृतदेह अशोक बारकू बलमे यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला.होता सर्वत्र चर्चा ही संदिपने आत्महत्या केल्याची होती परंतु राहुरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक गणेश वाघमारे व रामनाथ सानप यांनी काही तासातच तपासाचे चक्र फिरवून घटनेचा तपास लावला आणि आरोपी जगन भिमाजी गेठे याला अटक करून त्याच्या मुसक्या आवळलल्या
आज दुपार दरम्यान एका शेतकऱ्याच्या नजरेस विहिरीत काहीतरी तरंगताना दिसले. नीट पाहिल्यावर ते मृतदेह असल्याचे समजताच त्यांनी तात्काळ ही माहिती राहुरी पोलिसांना कळवली.
माहिती मिळताच राहुरी पोलीस घटनास्थळावर दाखल झाले.स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि रवींद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह ग्रामीण रुग्णालय, राहुरी येथे पाठविण्यात आला. तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
शेतीच्या वादामुळे घातपात असा गावकऱ्यांत संशय खरा ठरला आहे
संदीप गेठे हा संगमनेर तालुक्यातील समनापुर येथील गावचा रहिवाशी होता परंतु त्यांना वडनेर येथे शेती मिळाल्यामुळे वडनेर येथील वरशिंदे रोडलगत राहत होता. गेल्या काही दिवसांत त्याचे काही लोकांबरोबर शेतीसंबंधी वाद सुरू असल्याची चर्चा गावात होती.परंतु सख्या भावानेच विहिरीत ढकलून दिल्यामुळे हा घातपात च आहे हे सिद्ध झाले .
पोलिसांनी प्राथमिक व जलदगतीने तपास करून खुणाचा तपास लावला.शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.संदीप गेठे यांच्या अकस्मात मृत्यूने वडनेर गावात शोककळा पसरली आहे. यावेळी किरण भाऊ गव्हाणे सुखदेव बलमे सदस्य वडनेर ग्रामपंचायत.हौसिनाथ बलमे.अण्णा पाटील बलमे.अण्णा पाटील खेमनर विजय बलमे सरपंच वडनेर यांनी मदत कार्य केले आहे संदीपच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आई आणि भाऊ असा परिवार असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.








