अहिल्याबाई होळकर देडगाव शाळेचे प्रयोगशाळा परिचर गणपत मुंगसे यांचा कार्यगौरव सेवापूर्ती समारंभ संपन्न.

देडगाव ( प्रतिनिधी) दि.८. रोजी. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मा.सुनिताताई गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासन अधिकारी मुळा एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अशोकराव तुवर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये गणपत नारायण मुंगसे यांचा सेवापूर्ती समारंभ पार पडला.

    या कार्यक्रमाला अध्यक्ष मुळा एज्युकेशन सोसायटी चे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे हे लाभले. शाळेतील मुलींनी स्वागत गित घेउन कार्यक्रमाला सुरूवात केली. यावेळी इंजिनीयर राहुल शामराव घोरपडे,ग्रामपंचायत देडगाव ,विविध कार्यकारी सेवा सोसायटी ,माजी विद्यार्थी संघ देडगाव, पत्रकार संघटना, निलेश भाऊ कोकरे मित्र मंडळ , अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आशा अनेक संघटनेच्या वतीने व वैयक्तिक स्वरूपाचे सपत्निक सत्कार करण्यात आले.

         सेवापूर्ती कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद कराळे सर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात गणपत मुंगसे( तात्या )यांनी शाळेवर केलेले नितांत प्रेम व शाळेविषयी मनात उच्चप्रतीची भावना व शाळेमध्ये आयुष्यभर केलेले इमानदारीचे काम याचा गुणगौरव करण्यात आला.

       यांनतर डॉ. अशोकराव तूवर सर ,माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे , पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, माजी विद्यार्थी संघाचे संदिप नांगरे सर ,व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे या मान्यवरांनी गणपत तात्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या व पुढील काळासाठी निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. 

      सत्काराला उत्तर देत गणपत तात्या यांनी मला मुळा एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी व सर्व शिक्षक यांनी खुप खुप प्रेम दीले. म्हणत सर्वाचे स्वागत करत या सर्व सन्मानाने मी भाराऊन गेलो आहे. या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली.

          या या कार्यक्रमास माजी उपसभापती कारभारी चेडे , ज्येष्ठ पत्रकार बन्‍सी भाऊ एडके,,विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे ,उप सरपंच लक्ष्मणराव गोयकर , खरेदी विक्री संघाचे संचालक कडूभाऊ तांबे, पंचायत समिती सदस्य दादासाहेब एडके, तंटामुक्ती अध्यक्ष कारभारी मुंगसे प्रगतशील शेतकरी चंद्रभान कदम , माजी प्राचार्य भावरावं मुंगसे,माजी पोलीस दादासाहेब वाहुरवाघ ,श्रीमंत पुंड माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे बन्सी पाटील मुंगसे युवा नेते निलेश भाऊ कोकरे श्रीकांत हिवाळे, बळीराजा संघटनेनचे मच्छिंद्र मुंगसे,कडूबाळ दळवी, फकिरचद हिवाळे ,देवस्थान विश्वस्त सुभाष मुंगसे, उध्दव मुंगसे, महादेव मुंगसे, नवनाथ मुंगसे, नारायण एडके, बाळासाहेब मुंगसे, वसंत मुंगसे, अहिल्याबाई होळकर शाळेचे प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड व सर्व शिक्षक वृंद , सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी ,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य सर्व परिसरातून आलेले नातेवाईक,मित्र व आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तबला विशारद निवेदक संदिप नांगरे सर यांनी केले तर आभार भुजबळ सर यांनी मानले.