महसूल कर्मचार्यांच्या बेमुदत संपामुळे उन्हाच्या -कहारात सामान्य जनतेचे हाल
दि.४ एप्रिल पासून महसूल कर्मचारी संघटणेचे कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने राहुरी तालुक्यातील विविधकामे घेवून आलेत्या नागरीकांची कामे तहसिल कार्यालयात होत नसलेने नागरीकांचे हाल पाहावयास मिळतात.
शासन निर्णय १.मे२०२१ अन्वये शासन स्तरीय केलेला नायब तहसिलदार संवर्ग रदध करून अव्वल कारकुन मधून नायब तहसिलदार पददोन्नतीची प्रक्रीया पूर्ण करावी महसूल सहाय्यकाची रिक्त पदे भरण्यात यावी नायब तहसिलदार ग्रेड पे. ४300 वरून ४६०० करावा दांगट समितिचा अहवाल प्रसिद्ध करून आकृती बंद लागु करावा संजय गांधी ' निवडणूक ' रो ह यो ' पि एम किसान ' वगैरे महसूल कामांसाठी स्वतंत्र पदे निर्माण करावीत सुधारीत निकसा अन्वये पदोन्नतीची प्रक्रिया विहीत काल मर्यादेत पूर्ण करावी पात्र चतुर्थश्रेणी कर्मचार्यांना महसूल सहाय्यक पदी पदोन्नती द्यावी चतुर्थश्रेणी कर्मचार्यांचा कोठा २५% वरून ५०% करावा नविन तालुक्यात महसूली कामा करीता पद निर्मीती करून सदर पदे तात्काळ भरावी.
गृह विभागाच्या धरतीवर महसूल कर्मचार्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा प्रस्ताव मंजूर करावा राज्यस्तरीय महसूल क्रिडा व सांस्कृतीक स्पर्धा दरवर्षी नियमीतपणे पार पाडाव्यात गौन खनिज विभागात खनिकर्म निरिक्षक हे अ.का. दर्जाचे पद निर्माण करावेत महसूल दिन दर वर्षी राज्य विभाग व जिल्हा स्तरावर साजरा करावा व त्याकरीता निधी उपलब्ध करावा अशा विविध मागण्या राज्य शासनाकडे करून ह्या मागण्या शासनाकाडून मान्य करून घेण्यासाठी राज्य महसूल कर्मचारी संघटणेने बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.
सदर महसूल कर्मचारी संपावर गेलेने तहसिल कार्यालयाकडे असलेली जनतेची कामे ठप्प झालेली आहेत तसेच राज्यात उन्हाचा मोठ्या प्रमाणात पारा चढल्याने सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट होताना दिसून येत आहे.