सुट्टीची संधी साधून अहमदनगर बायपास येथून अवैध लालमाती वाहतूक जोमात सुरू .

सुट्टीची संधी साधून अहमदनगर बायपास येथून अवैध लालमाती वाहतूक जोमात सुरू .

अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी बरोबरच अवैध उत्खनन तसेच लाल मातीची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे.

         अहमदनगर परिसरातून तसेच विळद बायपास रोडवरून सुट्टीची संधी साधत भरधाव वेगाने ढंपरच्या साह्याने अवैध वाहतूक चालू आहे. शासकिय सुट्टी असल्याने महसूल विभागाचे अधिकारी येणार नाही याची पक्की खात्री असल्याने बिनधास्तपणे लाल मातिची वाहतूक चालू आहे परंतू जास्त ट्रिपा व्हाव्यात याउद्देशाने ढंपर चालक बेधुंद होऊन वाहतूक करतांना दिसत आहे . विशेष म्हणजे लाल मातिची वाहतुक करणाऱ्या ढंपरच्या नंबरप्लेट वरिल नंबर खोडलेले आहेत. एखादी दुर्घटना घडली तर ढंपरचालक किंवा मालक यांना पकडणे अवघड होते.

          जिल्ह्यात व परिसरात चालणाऱ्या अवैध व बेधुंद वाहतुकीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांमध्ये भितिचे वातावरण पसरले आहे . या अवैध वाहतुक करणाऱ्या ढंपर चालक व मालक यांना वेळीच आवर घालणे महत्वाचे आहे यासाठी माननिय जिल्हाधिकारी यांनी या अवैध वाहतुक करणा-यांकडे त्वरित लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी नागरिक व प्रवासी करत आहेत.