नेवासा तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील मोठी बातमी. तालुक्यात चर्चेला उधाण.

नेवासा तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील मोठी बातमी. तालुक्यात चर्चेला उधाण.

नेवासा तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील मोठे ब्रेकिंग मा. आ. बाळासाहेब मुरकुटे यांचे कट्टर समर्थक नगरसेवक राजेंद्र मापारी यांच्या हाती शिवबंधन...

प्रतिनिधी:- नेवासा मा. आ. बाळासाहेब मुरकुटे यांचे कट्टर समर्थक तसेच नेवासा नगरपंचायत प्रभाग क्र. १४ चे विद्यमान नगरसेवक राजेंद्र मापारी यांनी कार्यकर्त्यांसह, मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत आज हाती शिवबंधन बांधले आहे. 

 

त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र भारतीय जनता पार्टीचे युवानेते स्वप्नील मापारी यांनीदेखील नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

 

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्त्यांची गळती सुरू आहे.विविध सामाजिक कामात कायम अग्रेसर असलेले नगरसेवक राजेंद्र मापारी व युवकांचे संघटन असलेले, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ते जिल्हा उपाध्यक्ष पर्यंत विविध पदे भूषविलेले युवानेते स्वप्नील मापारी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेशानंतर नेवासा शहरात भारतीय जनता पक्षाला मोठे खिंडार पडल्याचे दिसून येत आहे.

 

यावेळी मा. ग्रा.सदस्य प्रवीण मापारी, कहार समाजाचे व भाजप युवा मोर्चाचे मा. उपशहराध्यक्ष शरद पंडुरे, सोमेश मापारी, सागर पंडुरे, अनिकेत मापारी, गणेश चौधरी, आर.के.कन्स्ट्रक्शन चे इंजिनिअर तुषार परदेशी, अजय रासने, प्रवीण गायकवाड, समीर मापारी, प्रसाद मापारी, आशिष मापारी, गौरव राहुरकर, तेजस मापारी, शिवाजी शेजुळ, राहुल म्हस्के, अक्षय करंडे आदी सह कार्यकर्त्यांनी प्रवेश केले. यावेळी जाकीर शेख, अनिल शिंदे, आशिष कावरे, अजिंक्य जगताप, पत्रकार सौरभ मुनोत व पत्रकार अभिषेक गाडेकर उपस्थित होते.