राहुरी पोलीसां कडून 102 व्या अल्पवयीन मुलीचा शोध

राहुरी शा प्रती - डॉ देवेंद्र शिंदे
राहुरी पोलिसांकडून 102 व्या अल्पवयीन अपहरण झालेल्या मुलीचा शोध .
*ऑपरेशन मुस्कान अभियाना अंतर्गत राहुरी पोलिसांकडून मागील 9 वर्षात अपहरण झालेल्या तब्बल 102 मुलींचा मागील दोन वर्षात शोध घेऊन पालकांच्या ताब्यात....*
राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याबाबत तिच्या पालकांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 13.01. 2026 रोजी गुन्हा दाखल केलेला होता .
सदर अल्पवयीन मुलीचा दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी शोध घेऊन राहुरी पोलिस तपास पथकांनी ताब्यात घेऊन आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
दि.12/01/2026 रोजी सकाळी 10.00 वा वाजण्याच्या सुमारास ही राहते घरातून कोणाला काही एक न सांगता घरातून निघून गेली व परत आली नाही म्हणून मुलीचे अपहरण झाल्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 42/2026 भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) प्रमाणे दाखल करण्यात आला होता . सदर मुलीचा शोध पोलीस नाईक सुनील निकम, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश भोसले यांनी शोध घेऊन तीस पालकांचे ताब्यात दिले.तिचे अपहरणाबाबत सखोल तपास सुरू आहे.
सदर कारवाई मा. सोमनाथ घार्गे पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर , मा. सोमनाथ वाघचौरे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर , मा. जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, API सुदाम शिरसाठ, PSI समाधान फडोळ , PSI राजू जाधव,पोलीस नाईक सुनील निकम, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश भोसले,HC नागरगोजे , PC कांबळे,pc धायगुडे,pc लिपने,pc शिंदे,pc नदीम शेख सायबर सेल श्रीरामपूर येथील पोलीस हवालदार संतोष दरेकर, पोलीस हवालदार सचिन धनाड यांनी केली आहे सदर गुन्हयाचा तपास पोलीस नाईक निकम हे करीत आहेत.
राहुरीतील सर्व जनतेमधुन राहुरी पोलीसांचे आभार व्यक्त केले









