नगर मनमाड महामार्गावरती अपघाताचे सत्र सुरूच

नगर मनमाड महामार्गावरती अपघाताचे सत्र सुरूच
नगर मनमाड महामार्गावरती अपघाताचे सत्र सुरूच

नगर मनमाड महामार्गाचे काम बंद होताच शहरात दोन अपघात. एकाच मृत्यू तर तीन जखमी.

राहुरी ता प्रती -डॉ देवेंद्र शिंदे

राहुरी तालुक्यातील गौटुंबा आखाडा येथील संकेत सखाराम बाचकर वय 18 या तरुणाचा राहुरी येथील गाडगे आश्रम शाळे समोर अपघाती मृत्यू.नगर मनमाड या महामार्गाचे काम चालु असल्यामुळे ठीक ठिकाणी खडी टाकून ठेवली आहे त्यामुळे जड वाहतूक करणारे ट्रक हे खडी चा रस्ता वाचवण्यासाठी वाहने नीट चालवत नाहीत याच कारणाने आज दिनांक 26 जानेवारी रोजी राहुरी येथील गाडगे आश्रम शाळे समोर मालवाहतूक करणारा ट्रक क्रमांक. टी एन 29 बी झेड 3381 या वाहनाने संकेत बाचकर आणि श्रीकांत हापसे या दोन तरुणांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने संकेत हा ट्रक च्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला व श्रीकांत हापसे या तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. संकेत बाचकार हा लोणी येथे बी एस सी ऍग्री चे शिक्षण घेत होता.आणि श्रीकांत हापसे हा राहुरी कॉलेज येथे शिक्षण घेत होता. आज प्रजासत्ताक दिवस असल्यामुळे हे दोघेही तरुण राहुरी कॉलेज येथून प्रजासत्ताक दिन साजरा करून गौटुंबा आखाडा येथे घरी परतत असताना हा अपघात झाला आहे.अपघात इतका भयानक होता की संकेत च्या अंगावरून ट्रक गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. संकेत हा हा अतिशय हुशार आणि शांत स्वभावाचा होता. आणि संकेत ला एक भाऊ आणि आई वडील आहेत. तर संकेत चे वडील सखाराम बाचकर हे स्कूल बसवर ड्राइवर चे काम करतात. संकेत चा स्वभाव अतिशय प्रेमळ होता त्याच्या अपघाती मृत्यू मुळे गौटुंबा आखाडा परिसरात शोककळा पसरली आहे. हा अपघात होताच काही मिनिटात लगेचच राहुरी बस स्टॅन्ड समोर दुसरा अपघात झाला त्यात.कानडगाव येथील प्रसाद शरद गागरे वय 18 या तरुणाला आईशर टेम्पो ने उडवले त्यात प्रसाद या तरुणाच्या हाताचा पंजा पूर्णपणे ठेचला गेला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. आणि सार्थक कैलास आहेर वय 19.या तरुणाला किरकोळ दुखापत झाली.या एका पाठोपाठ झालेल्या अपघातामुळे एका तरुणाचा मृत्यू तर तीन तरुण जखमी झाल्या मुळे नागरिकामध्ये रोश निर्माण झाला आहे त्यामुळे पुढील काळात मोठे आंदोलन करण्याच्या पावित्र्यात नागरिक असल्याचे समजते.

अपघाताचे सत्र अजून किती दिवस चालणार अशी जनतेतून तीव्रज नाराजी व्यक्त करण्यात येत असूनआणखी किती लोकांचा  जीव घेणार हा रस्ता

सगळीकडचे रस्ते चांगले आहेत पण कोपरगाव ते विळद घाट पर्यंत रस्त्याची अतिशय निंदनीय अवस्था झाली आहे