शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुखपदी देवेंद्र लांबे पाटील यांची नियुक्ती .

शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुखपदी देवेंद्र लांबे पाटील यांची नियुक्ती .

*शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुखपदी देवेंद्र लांबे पाटील यांची नियुक्ती*

 

*तालुकानिहाय विस्तार अन् युवा संघटनांवर भर; राहुरी तालुका प्रमुखांच्या उत्तम कार्याची पक्षाकडून दखल*

          हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या शिवसेना पक्षात निष्ठेने व तत्परतेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेहमीच योग्य सन्मान दिला जातो. श्री. देवेंद्र लांबे पाटील हे शिवसेना पक्षाचे राहुरी तालुका प्रमुख म्हणून अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहेत. तालुक्यातील त्यांच्या संघटनकौशल्याची आणि धडाडीच्या कार्याची दखल घेत, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाची ताकद अधिक प्रभावीपणे वाढवण्यासाठी देवेंद्र लांबे पाटील यांच्यावर ही अधिकची व महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

              त्यांची शिवसेना सोशल मीडियाच्या अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली असून, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना सोशल मीडिया राज्य प्रमुख मा. राहुल एन. कनाल, उपराज्य प्रमुख मा. प्रतिक शर्मा आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख मा. मयुर मगर यांच्या स्वाक्षरीने हे अधिकृत नियुक्ती पत्र जारी करण्यात आले आहे.

             अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिवसेना सोशल मीडिया कक्षाचा विस्तार प्रत्येक तालुक्यामध्ये करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देवेंद्र लांबे पाटील यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये युवकांना सोबत घेऊन शिवसेना पक्ष संघटनेचे काम तळागाळापर्यंत पोहोचविण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तरुण-तरुणींना डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पक्षाशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

            आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडिया हे जनसंपर्काचे प्रभावी माध्यम ठरत आहे. राज्य सरकारचे लोककल्याणकारी निर्णय, जिल्ह्यातील विकासकामे आणि महायुती सरकारच्या विविध योजना जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत जलद गतीने पोहोचवण्याचे काम सोशल मीडिया टीमच्या माध्यमातून आक्रमकपणे केले जाणार आहे.

          राहुरी तालुका शिवसेना प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत असतानाच उत्कृष्ठ संभाषण कौशल्य, संघटन कौशल्य या कार्याचा आढावा घेत आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये सोशल मीडिया नेटवर्क बळकट करण्याची मोठी जबाबदारी मिळाल्याबद्दल देवेंद्र लांबे पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राजकीय, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून, पक्ष पदाधिकाऱ्यांकडून तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.