चोरीचे सोने घेण्यास सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील सराफांना राण मोकळे.
प्रतिनिधी :-सोनई
सोनई पोलीस स्टेशन हद्दीत सराफांना चोरीचे सोने घेण्यास राण मोकळे .
याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की गेल्या काही दिवसापूर्वी एका संवेदनशील चोरीच्या गुन्ह्यांमध्ये 21 तोळे सोने सराफांनी विकत घेतले होते त्यापैकी 11.5 तोळे चोरीचे सोने सोनई पोलिसांनी हस्तगत केले.
आरोपीही ताब्यात घेतला ,परंतु एवढ्या मोठ्या रकमेचे सोने सराफांनी विना पावती कसे घेतले व पोलिसांनी हस्तगत करूनही सराफांना क्लीन चिट दिल्यामुळे भावी
काळात सराफांना चोरीचे सोने घेण्यास रान मोकळे झाल्याचे स्पष्ट होते.
चोरीचे सोने घेऊनही सराफ निर्दोष कसे यामागे काही आर्थिक तडजोड तर नाही ना अशी उलट सुलट चर्चा जनतेमधून ऐकवयास मिळत आहे.
तरी या मागचा झोल झाल काय आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.