श्रीराम विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.
श्रीराम विद्यालयात संविधान दिन साजरा.
भारत भालेराव
तालुका प्रतिनिधी,
शेवगाव: श्रीराम विद्यालय ढोरजळगाव येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमांचे पूजन करण्यात आले व विद्यालयातील विद्यार्थिनी कु.हर्षदा वाकडे हिने संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन सर्वांसमोर केले.
विद्यालयातील शिक्षक अमोल भालसिंग यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची परिस्थिती,संविधानाची गरज आणि संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि संविधान सभेत भारतीय घटनेचा स्वीकार या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील जायभाये यांनी आपल्या मनोगतात २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपण संविधान स्वीकारले आणि २६ नोव्हेंबर २०१५ पासून भारतीय नागरिकांमध्ये संविधान मूल्याचा प्रसार व्हावा म्हणून आपण संविधान दिन साजरा करत असतो.भारताचे संविधान जगातील एकमेव आणि मोठे लिखित संविधान आहे. आपल्या दैनंदिन व्यवहारात घडणाऱ्या घटनांचे सनियंत्रण संविधानातील कायद्यानुसार होत असते संविधानामुळे भारतीय नागरिकांना समता,बंधुता आणि एकात्मता हे मूल्य मिळाले आहे. संविधानांतर्गत सर्वोच्च न्यायालय,उच्च न्यायालय, संसद,राज्य विधिमंडळ,पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यासह देशातील सर्व न्यायालये त्याअंतर्गत काम करतात असे मत मांडले.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे,पर्यवेक्षक सुनील जायभाये,संस्था प्रतिनिधी सुरेश तेलोरे,जेष्ठ शिक्षक भागचंद मगर, राम काटे,पांडुरंग व्यवहारे,कल्याण राऊत,सुधाकर आल्हाट,प्रा.रामदास गायकवाड यांचेसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश तेलोरे यांनी तर सुत्रसंचालन श्रीम.पूनम वाबळे यांनी केले.ईश्वर वाबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.