अखिल भारतीय सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ मुंगसे यांच्यावतीने नूतन सरपंच चंद्रकांत मुंगसे सह उप सरपंच व सदस्यांचा सन्मान.
बालाजी देडगाव:- (प्रतिनिधी युनूस पठाण) नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे आज शनिवार २. रोजी आताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय झालेले नूतन सरपंच चंद्रकांत मुंगसे ,उपसरपंच महादेव पुंड व सदस्य यांचा अखिल भारतीय सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेशभाऊ मुंगसे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
______________________________________________________
अखिल भारतीय सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेशभाऊ मुंगसे हे देडगावचे भूमिपुत्र असून ही त्यांची जन्मभूमी आहे तर अहमदनगर ही त्यांची कर्मभूमी आहे. गावाच्या धार्मिक, भौतिक विकासासाठी त्यांचा मोलाचा हातभार असतो .गावातील हनुमान मंदिर सप्ताहाची काल्याला महाप्रसादाची पंगत देत असतात व अनेक सर्वसामान्यांची नगरमध्ये कोणत्याही ठिकाणी अडीअडचणीमध्ये उभा राहून अडचण सोडवत असतात. अशा विविध कामांनी देडगाव कराबरोबर जिव्हाळ्याचे नातं त्यांचं घट्ट आहे.
सरपंच चंद्रकांत मुंगसे
______________________________________________________
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खरेदी विक्री संघाचे मा. संचालक कडूभाऊ तांबे होते तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रथमतः अखिल भारतीय सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ मुंगसे यांचा देडगाव ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेशभाऊ मुंगसे यांनी विद्यमान सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना गावच्या विकासासाठी व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे , मा. ग्रामसेवक भाऊसाहेब मुंगसे , देडगाव सोसायटीचे माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे,गणपत तात्या कोकरे, बबन तात्या मुंगसे ,हनुमंत फुलारी नूतन सदस्य जालिंदर मामा खांडे ,बाळासाहेब मुंगसे ,अभिजीत ससाणे ,शरद तांबे, कानिफनाथ गोयकर, लक्ष्मण सर मुंगसे, पोपट मुंगसे, विश्वास हिवाळे, सचिन मुंगसे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पा दळवी, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, विश्वस्त रामभाऊ कुटे, सुभाषराव मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, पावन गणपतीचे तज्ञ विश्वस्त अशोकराव मुंगसे, युवा नेते बाबू मुंगसे, फक्कड पगारी दाजी, माझी चेअरमन भानुदास मुंगसे, सूर्यभान सोनवणे, दत्तू आप्पा तांबे, सोसायटीचे संचालक संदीप कुटे, गंगाधर मुंगसे, मुरलीधर आप्पा मुंगसे, भाजीपाला खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रमेश मुंगसे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार लक्ष्मण मुंगसे सर यांनी मानले.