स वाटप.

प्रतिनिधी नेवासा
नेवासा येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा नेवासा यांच्या वर्धापनदिन निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दारूंटे मळा या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही, पेन्सिल, खोडरबर, शाॅपनर आदि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडिया चे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ,त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यात स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याच्या गुणांना जागृत करण्यासाठी मार्गदर्शन केले.
उपयोगी शालेय साहित्य मिळाल्यावर विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने खुलून गेले .
साहित्य वाटप प्रसंगी एसबीआय शाखाधिकारी अभयकुमार गाठयांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, यावेळी हेड ऑफिसर अमोल डोळसे, छोटुराम जिरे, मुख्याध्यापक संदिप जंगले, शिक्षिका सुवर्णा भांड, पालक शितल व्यवहारे,दारूंटे काका यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा देत एक नाविन्यपूर्ण उपक्रम पूर्णत्वास नेला.