स्नेह फाउंडेशन सोनई यांच्या वतीने वृक्षारोपण व शालेय साहित्याचे वाटप.

स्नेह फाउंडेशन सोनई यांच्या वतीने वृक्षारोपण व शालेय साहित्याचे वाटप.

प्रतिनिधी खेडले परमानंद

    स्नेह फाउंडेशनचा निसर्ग संवर्धनाचा आणखी एक सामाजिक उपक्रम.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेणवडगांव येथे स्नेह फौंडेशन सोनई यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग प्रेम रुजावे म्हणून वृक्षदिंडी, वृक्षरोपण व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम दिनांक 1 ऑगस्ट 2023 लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णा भाऊ साठे जयंती व कृषीदिना च्या निमित्ताने स्नेहफौंडेशन सोनई या सामाजिक संस्थे च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेणवडगांव येथे सर्वं ग्रामस्थ, पालक विध्यार्थी, शिक्षक, व स्नेह फौंडेशन च्या अध्यक्ष सौ संगिता जोरवर व सर्वं सदस्य यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

झाडे लावा, झाडे जगवा, एक मुलं एक झाड, हाक देतसे धरती माई जतन करूया वनराई, वृक्ष बोले माणसाला नका तोडू आम्हाला अश्या घोषणांनी शाळेपासून गावातील मंदिरा पर्यंत वृक्ष दिंडी काढून मंदिर नदीच्या बाजूला मान्यवराच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर नंतर जिल्हा परिषद शाळा शेणवडगांव शाळेच्या प्रांगनात उपस्थित सर्वांचे शाळेतील चिमुकल्या नी स्वागतगीता तुन स्वागत केले.

              डॉ. शिरसाठ यांच्या अध्यक्षते खाली लोकमान्य. टिळक व सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

    स्नेह फौंडेशनच्या कार्याची ओळख आपल्या प्रास्ताविकात गोरक्षनाथ पटारे यांनी दिली यांनतर विद्यार्थ्यांचे भाषणे झाली.    

        स्नेह फौंडेशन मार्फत सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यपिका ढगे मॅडम यांनी केले.

     या कार्यक्रमास शेणवडगांव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर शिंदे, सरपंच नानासाहेब जाधव, गणपत जाधव, राजेंद्र जाधव, भगवान जाधव, अनिल भाऊतुवर ,श्रीकांत जाधव, चंद्रकांत जाधव, गणूभाऊ जाधव, पांडूभाऊ जाधव, नवनाथ घोडके, गिरीधर जाधव, शरद जाधव, व स्नेह फौंडेशन च्या अध्यक्ष सौ संगिता जोरवर, श्री. जोरवर..डॉ शिरसाठ गोरक्षनाथ पटारे, सोनवणे, दिगंबर जाधव, विठ्ठल जाधव, किरण केंगे, कर्णासाहेब जाधव, पत्रकार संभाजी शिंदे, मेजर भाऊसाहेब तांदळे, किशोर केदारी साहेब,संदीप बेल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते शाळेच्या उपाध्यपिका बोलके मॅडम यांनी आभार व्यक्त केले.