शिवराज्य यात्रेनिमित्त पारनेरचे आ . निलेश लंके यांच्या पत्नी सौ. राणीताई लंके यांचे राहुरीत जल्लोषात स्वागत, विरोधकांना भरणार धडकी.

शिवराज्य यात्रेनिमित्त पारनेरचे आ . निलेश लंके यांच्या पत्नी सौ. राणीताई लंके यांचे राहुरीत जल्लोषात स्वागत, विरोधकांना भरणार धडकी.

१२ जानेवारी २०२४ शिवराज्य यात्रे निमित्त अहमदनगर जिल्ह्यातील ता.पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेशजी लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या सौ .राणीताई लंके यांचे JCB मशिनद्वारे पुष्पवृष्टी करून राहुरी शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले                      शिवराज्य यात्रे निमित्त हा दौरा आयोजित करण्यात आला . राहुरी बस स्टॅन्ड जवळील जिजामाता चौकात त्यांच आगमन झाल त्याप्रसंगी रिपाई शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनुसंगम शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी रिपाई चे राहुरी तालुका अध्यक्ष विलासजी साळवे यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली .

           त्यावेळी रिपाईचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रवीणजी लोखंडे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला या जनसंपर्क कार्यालयास आपण पुन्हा भेट देणार असून आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात रिपाईचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रवीणजी लोखंडे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्रजी , तालुका अध्यक्ष विलासजी साळवे आदींशी सौ. राणीताई चर्चा करणार अल्याचे त्यांनी सांगीतले .

             या प्रसंगी धनराज गाडे ,अनिल पडघडमल , योगेश घाडगे ,स्वप्निल बोरुडे, तान्हाजी पवार आदींसह जनसमुदाय यावेळी उपस्थीत होते.तत्पूर्वी सौ राणीताई लंके यांनी म.फु.कृ विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळून विद्यापीठाचा आढावा घेत पुढे प्रस्थान केले.