नगरच्या कॅन्टीन वाल्यांकडून अग्नी विरांची आर्थिक लुटमार ...

जिल्हा अहमदनगर राहुरी कृषी विद्यापीठ प्रक्षेत्रात अग्नीविर या सैन्यदलाची भरती मोहीम सुरू असून बीड.लातूर. उस्मनाबाद. व इतर जिल्ह्यातून सैन्यात भरती होण्यासाठी दर दिवशी ५००० उमेद्वार सामील होत आहेत ही भरती २१ दिवस चालनार आहे.
भरतीसाठी आलेल्या उमेद्वारांची खाण्या पिण्याची गैरसोय होऊनये म्हणून खाद्या पदार्थांचे स्टॉल लावणेत आले आहे मोजक्या खाद्य पदार्थ विक्रेत्यांना हे स्टॉल लावणेसाठी परवानगी मिळाली असलेने स्थानीक हॉटेल वाल्यांना त्या ठीकाणाहुन हाकलून दिले आहे.
त्यामुळे मोजकेच स्टॉलधारक त्याठीकाणी उपलब्ध असलेने त्या गर्दीचा गैरफायदा घेऊन सदर विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाटल्या चहा नाष्टा इत्यादी खाद्य पदार्थांची चढ्या दराने विक्रि होत असून इतरत्र दुसरी व्यवस्था नसलेने ( आडला हरी ...... ) नाइलाजास्तव दामदुप्पट पैसे मोजण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे सदरच्या स्टॉलधारकास याबाबत विचारणा केली असता या स्टॉलधारकाकइन मगरूरीची भाषा वापरली जाते तरी स्थानीक राहुरी प्रशासनाने व मा. तहसिलदार साहेबांनी याबाबत गांभीर्याणे लक्ष घालून ह्या सैन्यदलात बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांची लुटमार थांबवावी अशी अग्नीवीर भरतीच्या उमेदवारांकडून मागणी होत आहे .