किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांची तपासणी.
किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये डॉक्टर डे निमित्त डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांची तपासणी. नगर/वार्ताहर//. येथील किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये डॉक्टर डे निमित्ताने शाळेमध्ये डॉक्टर योगेश वाघ, डॉक्टर प्रवीण तांबे, डॉक्टर पार्थ मरकड, डॉक्टर तुषार दराडे, डॉक्टर कोमल मोकाटे, डॉक्टर गायत्री बडाख, सायली निपाणी, डॉक्टर स्वाती अट्टल हे सोनई येथील डॉक्टर डॉक्टर डे च्या निमित्ताने किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये उपस्थित होते डॉक्टर तुषार दराडे व गायत्री बडा यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर डे निमित्ताने डॉक्टरांचे महत्त्व समजावून सांगितले तसेच विद्यालयातील यानिमित्ताने विद्यार्थ्यांची तपासणी देखील करण्यात आली डॉक्टर गायत्री बडाख यांनी किशोरवयीन मुलींना त्यांच्या सर्वांगीण विकास व मासिक पाळी बद्दल प्रशिक्षण दिले तसेच त्यांच्या दैनंदिन कामातून थोडा विरंगुळा म्हणून सर्व डॉक्टर्स साठी संगीत खुर्ची हा खेळ ठेवण्यात आला होता त्यात सर्वांनी सहभाग घेऊन त्याचा आनंद घेतला संगीत खुर्चीमध्ये डॉक्टर तुषार दराडे प्रथम तर सायली लिपाने द्वितीय तर गायत्री बडाख तृतीय असे क्रमांक मिळून खेळात विजयी ठरले याप्रसंगी शाळेचे सचिव सचिन बंग व मुख्याध्यापिका कीर्ती बंग व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शेवटी उपमुख्याध्यापक फटाले सर यांनी सूत्रसंचालन व सर्वांचे आभार मानले