कृषि दिनानिमित्त घोडेगाव येथे भानसहिवरे येथील कृषि कन्यांनी केले व्रुक्षरोपण..

कृषि दिनानिमित्त घोडेगाव येथे भानसहिवरे येथील कृषि  कन्यांनी केले व्रुक्षरोपण..

कृषि दिनानिमित्त घोडेगाव येथे भानसहिवरे येथील कृषि  कन्यांनी केले व्रुक्षरोपण.. 

( नगर वार्ताहर) नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे दि. १ जुलै रोजी  कृषिदिनाचे औचित्य साधुन भानसहिवरे येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय संस्था संचलित कृषि महाविद्यालय येथील  कृषिकन्यांनी गावातून   व्रुक्ष दिंडी काढत व्रुक्षरोपण केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला घोडेगाव येथील कृषि सहाय्यक गणेश भराट यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. विद्यालयातील  कृषिकन्यांनी उपस्थित शेतकरी , ग्रामस्थ, विद्यार्थी व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. आजच्या काळात आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात व्रुक्षतोड केली जाते. त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असल्याचे दिसून येत आहे. हे जर आपणास थांबवायचे असेल तर त्यासाठी व्रुक्षरोपण हे गरजेचे आहे. जेणेकरून मानवी जीवन सुखमय होईल असे भराट यांनी बोलताना सांगितले. या वेळी सरपंच राजेंद्र देसर्डा, उप. सरपंच यशवंत येळवंडे,तलाठी राजेंद्र भुतकर,पोलीस पाटील बाबासाहेब वैरागर, शाळेचे शिक्षक शेख, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, उपस्थित होते.  कृषिकन्या प्रांजल कांबळे, म्रुणालिनी रायकर, स्नेहल शिंदे, प्रतिक्षा शिंदे यांनी हा कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पाडला. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश तुरबतमठ, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. एम आर माने, कार्यक्रम अधिकारी प्रा. यु व्ही महाजन, प्रा. जे बी खकाळे , प्रा.सागर सोनटक्के यांचे मार्गदर्शन लाभले.