लोणी खुर्द येथे कार चालक व त्याच्या पत्नीस जातिवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी- दोघांवर अ‍ॅॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.

लोणी खुर्द येथे कार चालक व त्याच्या पत्नीस जातिवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी-  दोघांवर अ‍ॅॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.

आ  ( प्रतिनिधी ) :-  लोणी खुर्द येथे दि. २६/०६/२०२४ रोजी सायं. ६.०० वाजयाच्या सुमारास श्री अरुण प्रभाकर सौदागर व पत्नी स्वाती हिस महेश जालिंदर आहेर आणि विशाल जालिंदर आहेर या दोघा भावांनी जबर मारहाण केली.

               सविस्तर माहिती अशी की, अरुण सौदागर हे श्री अमोल बलभीम आहेर यांचे गाडीवर ड्रायव्हर म्हणून कामाला आहेत, संध्याकाळी ६.०० वाजता श्री अमोल आहेर यांचे सांगण्यावरून त्यांच्या घरासमोर अरुण सौदागर हे गाडी लावण्यासाठी जात होते, अमोल आहेर याचे घरासमोर महेश आहेर उभे होते म्हणून अरुण सौदागर यांना गाडी आत नेता येत नव्हती म्हणून अरुण सौदागर यांनी महेश आहेर यांना म्हटले की बाजूला व्हा मला गाडी गेटच्या आतमध्ये घ्यायची आहे तर या कारणावरून महेश आहेर याने अरुण सौदागर याला मारहाण सुरू केली तसेच त्याने त्याच्या भावाला बोलाऊन घेतले व दोघंही अरुणला मारायला लागले, अरुण ची पत्नी सोडवायला गेली तर तिलाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, अमोल आहेर त्यांचे आई वडील, भाऊ हे सर्व सोडवण्याचा प्रयत्न करत होते पण महेश आणि विशाल आहेर हे कुणाचेही ऐकत नव्हते त्या दोघांनी या नवरा बायकोस पीठ माघे मांगटे अशी जाती वाचक शिवीगाळ करत मारत होते नंतर महेश आणि विशाल आहेर यांचे वडील जालिंदर आहेर आले व त्यांनी हा सर्व प्रकार थांबवला त्यानंतर अरुण सौदागर आणि त्याची पत्नी स्वाती हे लोणी पोलीस स्टेशनला गेले परंतु त्यांचे म्हणणे कुणीही ऐकले नाही, लोणी पोलीस स्टेशनमध्ये अरुण यास चक्कर यायला लागली म्हणून त्याच्या पत्नीने व इतर नातेवाईकानी त्यास प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी त्यास अतिदक्षता विभागात अडमिट केले दोन दिवस त्याच्यावर उपचार चालू होते परंतु प्रशासन त्यांची कुठलीही दाखल घेत नव्हते म्हणून दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी या पीडितांना न्याय मिळवण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली आणि सर्व प्रकार समजून घेतला लोणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेण्यास सांगितले परंतु लोणी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल श्री साळवे म्हटले की तुम्हाला डी. वाय. एस.पी. साहेब शिर्डी यांनी बोलावले आहे.

             पिडीत श्री अरुण सौदागर त्यांची पत्नी स्वाती यांना घेऊन दलित महासंघाचे डी. वाय. एस.पी. साहेब शिर्डी यांचे कार्यालयात गेले व साहेबाना सर्व हकीगत सांगून डी. वाय. एस.पी. साहेबांनी लोणी पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. श्री वाघ साहेबाना फोन करून अट्रोसीटी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले परंतु दि. २९/०६/२०२४ रोजी गुन्हा नोंद होऊनही अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही तसेच पीडितांना व त्यांचे नातेवाईकाना केस माघे घेण्यासाठी गावातील काही लोक फोन करून दबाव टाकत आहेत. सदर प्रसंगी पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी दलित महासंघाचे राहता तालुका अध्यक्ष श्री अमोल जगधने, श्री योगेश बुऱ्हुडे, श्री सागर राक्षे, विकी राक्षे, दिलीप जगधने, कुणाल जगधने महिला आघाडीच्या सौ. हिना उबाळे, सागर उबाळे, ज्ञानेश्वर कनगरे, बबलू कनगरे आदी कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

             केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम करुन अत्याचार थांबत नाहीत तर या बाबतीत पिडीता करीता प्रशासकीय यंत्रणा प्रभावीपणे व प्रामाणिकपणे राबवली व आरोपीस त्वरीत कठोर शिक्षा केली तरच पुन्हा या प्रकारच्या घटना, अत्याचार, गुन्हा होणार नाही व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीवरील  अत्याचारास प्रतिबंध करता येईल व सुरक्षितता वाटेल.