म्हैसगाव ता. राहुरी येथे शासनाचे लाखो रुपये प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीकरीता खर्च झाले.परंतू आरोग्य केंद्रास सुरु करणेसाठी स्टाफ मिळेना - श्रमीक मुक्ती दलाचे कार्यकर्ते सुनिल गुलदगड.किरण विधाटे.करणार पाठपुरावा

श्रमिक मुक्तीदल लोकशाहीवादी महाराष्ट्र राज्य. कार्यकर्ते यांनी नागरिकांच्या तक्रारीनंतर

प्राथमिक आरोग्य केंद्र म्हैसगाव येथे पाहणी केली. तर आम्हाला धक्काच बसला! कारण अनेक दिवस वर्तमानपत्रातून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाले,अशा बातम्या येत होत्या. परंतु प्रत्यक्ष पाहणीनंतर असे लक्षात आले की प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झालीच नाही. कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत असे तेथील डॉक्टर यांच्याकडून सांगण्यात आले. आम्हाला अजून खूप स्टाफ ची गरज आहे. डॉकटर, सिस्टर,नर्स gnm, तसेच दोन शिपाई, दोन वाचमन, यांची गरज आहे. तशेच एक कॉम्पुटर चालक, केसपेपर देण्यासाठी एक कर्मचारी,मेडिसिन्स अत्याधुनिक यंत्रणा याची गरज आहे. असे ते यावेळेस म्हणत होते.तसेच या ठिकाणी इमारतीची पाहणी केली असता. सर्व खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. सर्व दिवे चोरीला गेली आहेत त्याच प्रमाणे लाईट त्या ठिकाणी नव्हती. एक शिलिंग फॅन चोरीला गेलेला आहे. अशी एकणदरित राम भरोशे म्हैसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची आवस्था आहे. यावेळेस किरन विधाटे आणि सुनिल गुलदगड यांनी पत्रकारांनशी संवाद साधला. किरण विधाटे यांनी लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण क्षमतेने चालू करावी अशी भूमिका मांडली तर सुनिल गुलदगड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाले नाही तर पंचायत समितीला टाळे टोकून आंदोलन करू अशी भूमिका मांडली. तसेच जनतेच्या प्रश्नावर राज्यकर्त्यांनी काम करावी असेही ते यावेळेस म्हणाले. प्राथमिक आरोग्य केंद्र लवकर चालू करावे असा जनतेचा सुर आहे.