अल्पवयीन मुलीस लैंगिक अत्याचार /अनैतिक कृत्य करण्याच्या उद्देशाने पळून नेण्यास मदत करणाऱ्या आईस अटक.

अल्पवयीन मुलीस लैंगिक अत्याचार /अनैतिक कृत्य करण्याच्या उद्देशाने पळून नेण्यास मदत करणाऱ्या आईस अटक.

          राहुरी पोलीस स्टेशन गु र न 39/24 भारतीय दंड विधान संहितेचे कलम 363 अन्वये गुन्हा दाखल असून दाखल गुण्हयाच्या तपासामध्ये सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस आरोपी विश्वास संतोष मकासरे वय 20 वर्ष राहणार संक्रापूर याने पळवून नेलेले असून त्यास त्याची आई नामे वैशाली संतोष मकासरे वय 45 वर्ष राहणार संक्रापूर हिने सदर आरोपीस तिच्यासोबत लैंगिक कृत्य करून विवाह करता यावा या उद्देशाने पळवुन नेल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने , सदर गुन्ह्यात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 366 अ वाढवण्यात आले असून पळवून नेण्यास प्रोत्साहन देणाऱ्या मुलाची आई-नामे वैशाली संतोष मकासरे वय 45 वर्ष हीस आज दिनांक 05/02/2024 रोजी दाखल गुन्ह्याच्या तपास कामी तथा लैंगिक अत्याचारासाठी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेणे कामी अटक केलेले असून पुढील तपास एएसआय ज्ञानदेव गरजे करत आहे. .

            सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे , विभागीय पोलीस अधिकारी डॉ .बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण , एएसआय ज्ञानदेव गरजे, पोलीस हवालदार शेळके पोलीस हवालदार वैराळ यांच्या पथकाने केलेली आहे.

          अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे यावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळांमध्ये कायदेविषयक जनजागृती करून विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात येत आहे.

          सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की अशाप्रकारे अल्पवयीन मुलींना विवाह करण्यासाठी /लैंगिक अत्याचार करण्यासाठी पळवून नेण्यास कुणी सहकार्य करत असल्यास त्याबाबतची माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशनला माहिती कळवावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच सर्व पालकांनी आपल्या मुलांचे वर्तन संशयास्पद वाटल्यास त्यांचेवर बारकाईने लक्ष ठेवावे असे आव्हान करण्यात येत आहे.