आपसी वैमनस्यातून सहकारी जवानावर SRPF जवानाकडून गोळी झाडून हत्या व स्वतःही केली आत्महत्या. तालुक्यातील पिंपरी शहाली येथे आज अंत्यसंस्कार.

आपसी वैमनस्यातून सहकारी जवानावर SRPF जवानाकडून गोळी झाडून हत्या व स्वतःही केली आत्महत्या. तालुक्यातील पिंपरी शहाली येथे आज अंत्यसंस्कार.

प्रतिनिधी:- संभाजी शिंदे, खेडले परमानंद

आपसी वैमनस्यातून टोकाची भूमिका ,पुणे येथून बंदोबस्तासाठी गडचिरोलला गेलेल्या SRPF जवानाने सहकारी जवाणा वर गोळी झाडून स्वतःही आत्महत्या केली.

 

 गडचिरोली येथे तैनात करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानाने अंतर्गत वादातून आपल्या सहकाऱ्यावर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना गडचिरोली येथे घडली आहे.

 

जवानावर गोळी झाडल्यानंतर या जवानाने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

 

या घटनेमुळे राज्य राखीव दलात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अतिदुर्गम -संवेदनशील मरपल्ली पोलीस ठाण्याच्या बॅरकमध्ये ही घटना घडली आहे.

 

बंडु नवथर आणि श्रीकांत बेरड अशी मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत. पुण्यातून हे जवान गडचिरोलीमध्ये तैनात करण्यात आले होतं

 

श्रीकांत बेरड आणि बंडु नवथरला यांच्यामध्ये अंतर्गत वादातून भांडण झाले होते. रागाच्या भरात रायफलमधून श्रीकांत याने बंडूवर गोळी झाडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

त्यानंतर श्रीकांत यांनी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. दोघेही दौंड पुणे येथील SRP कॅम्पचे जवान होते.

 

घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे.

       आज नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली याठिकाणी मूळ गावी शासकीय इतमामात बंडू नवथर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

     नेवासा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विजय करे व  फौज  फाटा मानवंदना देण्यासाठी उपस्थित होता.

         शहीद बंडू नवथर याला मानवंदना देऊन रायफल मधून फायरिंग च्या स्वरूपात सलामी देण्यात आली.

          या जवनाला अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. शोकाकुल वातावरणात ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी शहीद जवानाला अखेरची सलामी दिली.

            आपसी वैमनस्यातून झालेली ही घटना मोठा चिंतेचा विषय आहे. अशा टोकाच्या भूमिकेमुळे दोन कुटुंबांनी आपला आधारस्तंभ गमावला आहे.

              शहीद बंडू नवथर यांच्या पश्चात त्यांच्या परिवारामध्ये वृद्ध आई- वडील ,पत्नी व एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली या त्यांच्या मूळ गावी वास्तव्यास आहे.