अनुभवाधारित शिक्षणाद्वारे जैविक कीटकनाशकांचा प्रसार - नंदुरबार कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

अनुभवाधारित शिक्षणाद्वारे जैविक कीटकनाशकांचा प्रसार - नंदुरबार कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

"अनुभवाधारित शिक्षणाद्वारे जैविक कीटकनाशकांचा प्रसार – नंदुरबार कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम"

             दिनांक १३/८/२०२५ रोजी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या नंदुरबार येथील शासकीय कृषि महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून मौजे चौपाळे आणि लहान शहादा जिल्हा- नंदुरबार येथील गावांमध्ये 'अनुभवाधारित शिक्षण' मार्फत शेतकऱ्यांना जैविक कीटकनाशकांचे शेतीतील महत्व आणि वापर याबद्दल माहिती देण्यात आली. कृषि महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून जैविक बुरशीनाशके आणि कीटकनाशके ही तयार केली जातात. या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला. जैविक कीटकनाशके वापराची पद्धत, वेळ, आणि फायदे याबाबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात आली तसेच ही उत्पादने प्रत्यक्ष पिकांवर कशी वापरायची याबाबदल प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

            कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यु. बी. होले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला. तसेच मोड्यूल इनचार्ज/सहाय्यक प्राध्यापक डॉ. किरण देशमुख यांचे विध्यार्थ्यांना बहुमोल सहकार्य लाभले. कृषि महाविद्यालयात फुले ट्रायकोडर्मा, फुले बगीसाईड, फुले व्हर्टीसिलीअम आणि फुले मेटाऱ्हिझीम अशी विविध जैविक कीटकनाशके तयार केली जातात तसेच परोपजीवी कीटक ट्रायकोग्रामा चिलोणीस सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध असतात. विद्यार्थ्यांनी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करण्याबाबत शेतकऱ्यांना जैविक पर्यायांचे मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विध्यार्थी पंकज कुवर, प्रतीक कुळमेथे, प्रथमेश पवार, नीरज शेलकांडे, कु. स्नेहा ठाकरे, कु. गौरी जाधव आणि कु, प्रतीक्षा गवळी यांनी परिश्रम घेतले.