दूरदृष्टी लाभलेले नेतृत्व नगर जिल्ह्याला लाभले ते म्हणजे यशवंतराव गडाख यांच्या रूपाने :-सूर्यभान आघावा.

दूरदृष्टी लाभलेले नेतृत्व नगर जिल्ह्याला लाभले ते म्हणजे यशवंतराव गडाख यांच्या रूपाने :-सूर्यभान आघावा.

प्रतिनिधी खेडले परमानंद

मे महिना आला की माननीय यशवंतराव जी गडाख साहेब यांच्या यांच्या वाढदिवसाची आठवण येते आणि त्यानिमित्ताने अनेक आठवणींना उजाळा मिळतो.

     राहुरी तालुक्यात मुळा धरणाचं काम सुरू झालं आणि साहेबांच्या मनात विचार सुरू झाले कि आता आपल्या तालुक्याला धरणाचं भरपूर पाणी मिळेल आणि आपल्या इकडे उसाचे पीकही भरपूर मिळेल आणि क्षेत्र ही भरपूर वाढेल आहे. म्हणून आपण साखर कारखाना सुरू करायला पाहिजे आणि 1972 सालाला धरणाचं पाणी आलं आणि उसाचा क्षेत्र वाढत चाललं.

      1974 सालात माझा स्वतःचा दोन हजार टन ऊस झाला तो चार कारखान्यांना पाठवावा लागला तो कसा पाठवला माझे मला माहित आहे. दररोज एका कारखान्यावर फेरी असायची तिथे जाऊन अधिकाऱ्यांना विनंत करायच्या त्यांना खाऊ पिऊ घालायचं मग कुठेतरी ते उसाची तोड आपल्याकडे पाठवणार आणि इकडे आले की स्लिप मास्टर आणि ड्रायव्हर यांना खाण्यापिण्याचे व्यवस्था करायची अशा चार कारखान्यांना उसाची विल्हेवाट लावायचे त्यातून एका कारखान्याने एक रुपया सुद्धा दिला नाही.

     असे शेतकऱ्याचे खूप हाल होऊ लागले.

     पुढे यशवंतराव गडाख यांनी मुळा कारखाना अथक परिश्रमातून सोनईला सुरू केला.     

 

      कधी तोड येते आणि कधी ऊस तुटून जातो हे कळायचं सुद्धा नाही पैसे बँकेत अकाउंट वर जमा होऊन जायचे आणि हातात बिल येते अशा प्रकारे शेतकरी सुखी झाला .

      हे साहेबांची दूरदृष्ट आहे. असंच मी एकदा मुळा कारखान्याच्या मिटींगला गेलो मीटिंगच्या सुरुवातीला गेटवर नारळाचे नारळाची रोप ठेवलेली होते मीटिंग संपली आणि साहेबांचा अध्यक्षीय भाषण चालू झालं त्यांनी आवर्जून भाषणात सांगितलं की गेटवर नारळाची रोप ठेवलेली आहेत प्रत्येकाने पाच पाच रोप घेऊन जावेत त्याप्रमाणे मी माझ्याही गाडीत पाच रोप घेऊन आलो माझ्या परिसरात मी ते लावले आणि अशा प्रकारे मला झाड लावण्याचा झाड जोपासण्याचा छंद लागला.

        आज माझ्याकडे शेकडो नारळाची झाडं आहेत, चिकू आंबा ,आवळा ,पेरू ,डाळिंब जांभूळ ,चिंच ,लिंबू ,रामफळ सिताफळ ,बेल तसेच फुलझाडे बकुळ, चाफा ,सोनचाफा, मोगरा झेंडू ,गुलाब .

     अशोका साग चंदन लिंब असे अनेक प्रकारची झाडे आहेत .याला कारणीभूत म्हणजे ती साहेबांची मीटिंग आणि मीटिंग मधलं साहेबांचं भाषण अशा साहेबांच्या दूरदृष्टीचा आणि विचारांचा समाजाला तितकाच फायदा झालेला आहे एकदा कारखान्याला हार्वेस्टर मशीन घ्यायचे ठरले आम्हाला आठ पंधरा लोकांना साहेबांनी बोलावून घेतले आणि सांगितलं की ज्यांना मशीन घ्यायचा आहे त्यांनी शहाद्याला जाऊन मशीन बघून या आम्ही जाऊन आलो बरीच लोक उत्सुक झाले नंतर साहेबांनी मला एकट्याला बोलावून घेतलं आणि मला सांगितलं की आपल्याला सुरुवातीला एकच मशीन घ्यायचं पहिला मशीन तुम्ही घ्यावं. अशी माझी इच्छा आहे कारण तुम्ही पहिल्यापासून मशिनरी चालवत आले आहात आणि तुम्ही तज्ञ आहात तुमच्याकडे आधीच ट्रक आणि जेसीबी चा धंदा सक्सेसफुल आहे.

    तुम्ही अनुभवी आहात म्हणून म्हणत आहे की तुम्ही पहिलं मशीन घ्या मी म्हणालो माझ्याकडे तेवढे रक्कम नाही त्यांनी मला विचारलं की किती रक्कम आहे मी सांगितलं असतील ना दोन लाख रुपये ते म्हणाले तेवढे जमा करा बाकीचं मी बघतो आणि त्यांनी मशीनची ऑर्डर दिली परंतु कंपनीकडून फोन आला मशीन अर्ध्या सीजन मध्ये मिळेल साहेबांनी परत मला बोलावून घेतलं मशीनला थोडासा उशीर होईल त्यापेक्षा नकोच आता मशीन घ्यायला नंतरच नंतर बघू नंतर मी चार-पाच वर्षांनी मशीन घेतला आणि ते मशीन माझा नातू अक्षय त्याच्या मॅनेजमेंट नुसार त्याने मशीन चालू केले आणि त्या सिझनला त्याने देशात पहिला नंबर आणला तो नंबर आजपर्यंत टिकून आहे आणि एका मशीनचे पाच मशीन झाले याला म्हणतात साहेबांचे दूरदृष्टी.

     कोणत्या ठिकाणी कोणता माणूस योग्य आहे हे त्यांना बरोबर समजतं असंच एकदा पब्लिक स्कूल वर मुळा डॅम च्या पाणी योजनेची मीटिंग चालू होती आणि वरून पाऊस असल्यामुळे पत्र्याचा आवाज यायचा मी पब्लिक मध्ये बसलेलो होतो तिकडे काय चाललं याची मला कल्पना नव्हती स्पीकर चा आवाजही पावसामुळे थोडासा तुटत तुटत होता थोड्या वेळाने साहेबांचे पीए ते मग साहेब यांनी मला हात वर करून बोलावले मी त्यांच्याकडे जेव्हा गेलो आणि खाली बसलो साहेबांचे भाषण चालू झाले आणि त्यांनी माझे नाव डायरेक्ट 18 गाव पाणी योजनेचे अध्यक्षपदी जाहीर केले .

   निवड झाल्यानंतर आम्ही जेव्हा वर्गणीला फिरू लागलो विरोधी पक्षाचे लोक मला भेटले तेही खात्रीशीर बोलू लागले की आता निश्चितच पाणी योजना होणार साहेबांनी योग्य व्यक्तीची निवड केली आहे.

   त्यांनी विश्वासाने माझ्यावर त्यांची रक्कम सोपवले आणि 70 लाख रुपये जमा जमा झाले त्यानंतर नामदार शंकरराव गडाख साहेबांनी पाणी योजना ही मंजूर केले आणि ते 70 लाख रुपये मी शासनाकडे जमा केले पाणी योजना अशा प्रकारे सक्सेसफुल झाली आणि आजही ती योजना व्यवस्थित चालू आहे मी या निमित्ताने जनतेला आव्हान करतो आपण पाणी वाहून वाहून अनेक मोटर सायकली किंवा सायकली भंगारत टाकल्या पाणी आणण्यासाठी माणसाचा वेळ वाया जायचा दिवस दिवसभर पाण्यासाठी फिरावा लागत असे आणि खराब पाणी पिले की आजारी पडण्याचे भीती आजारी पडलं की अजून हॉस्पिटलला पैसे भरणे एवढा आपला खर्च शारीरिक कष्ट आणि वेळही वाचला याला कारणीभूत साहेबांचे विचार आणि दूरदृष्टी हे पाणी योजना आपल्यासाठी आपल्या माणसांनी चालू केलेली आहे तरी या पाणी योजनेसाठी आपणच हातभार लावावा आणि योग्य वेळी बिल भरण आपलं जबाबदारी आहे असे अनेक अनुभव मला साहेबांसोबत आलेले आहेत पण मी आज इथेच स्वल्पविराम घेतो साहेबांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांना उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा त्यांच्या विचाराचा आपल्याला अजून फायदा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

     लेखक व संकलक सूर्यभान आघाव.