*चोरी गेलेला किमती मुद्देमाल बार्शी तालुका पोलिसांकडून फिर्यादीस परत*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज
बार्शी (ता.बार्शी) बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कोरफळे येथे 22 ऑक्टोबर रोजी सिद्धेश्वर मस्के व सचिन हागरे या दोघांच्या घरी घरफोडी व जबरी चोरी झाली होती. जवळजवळ 19 तोळे सोने लुटून नेण्यास आले होते. तेव्हा अज्ञात चोरट्याविरुद्ध बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. ऐन दिवाळीच्या वेळेस हा चोरीचा प्रकार घडला होता. त्या चोरीचा तपास बार्शी तालुका पोलिसांनी लावून चोरी प्रकरणातील जप्त केलेला तीन लाख 66 हजार रुपये किमतीऐवज पोलिसांकडून फिर्यादीस सुपूर्द करण्यात आला. बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांचे पथक अतिशय कटाक्षाने शोध घेत होते.
या तपासादरम्यान वेगवेगळी पथके लावून शोध मोहीम करण्यात आली. पथक्याने या गुन्ह्यातील सुनील उर्फ (काळ्या) श्रावण शिंदे (रा.उस्मानाबाद), रवी उर्फ झोक्या अरुण काळे (रा.देवगाव), किरण अरुण पवार (रा.राळेरास) इतर आरोपींना निष्पन्न करून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. मुद्देमाल मिळवा म्हणून फिर्यादीने न्यायालयामध्ये अर्ज दाखल केले होते. न्यायालयाने परवानगी देताच दोन्ही गुन्ह्यातील मूळ फिर्यादीस मुद्देमाल सुपूर्त करण्यात आला.