अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा.

अहमदनगर : आरोपी नामे निलेश राजु झेंडे , वय -२२ वर्षे , रा.गेवराई रोड , शेवगाव जि . अहमदनगर याने पिडीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा . पी.आर. देशमुख साहेब , अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपीस भा.दं.वि. कलम ३७६ ( २ ) ( आय ) ( जे ) ( एन ) , ३७६ ( ३ ) व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ११ व १२ नुसार दोषी धरून आरोपीस २० वर्षे सक्त मजुरी व रूपये १०,००० / - रूपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षे साधी कैदेची शिक्षा सुनावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . घटनेची थोडक्यात हकीगत की , फिर्यादी यांची अल्पवयीन पिडीत मुलगी ही दहावी वर्गात शिक्षण घेत होती . दि .०४.०४.२०२२ रोजी पिडीतेचा दहावीचा शेवटचा पेपर होता . फिर्यादी हे संध्याकाळी जेवन करून झोपलेले असताना , त्यांची पिडीत मुलगी ही रात्री ज्या ठिकाणी झोपली होती त्या ठिकाणी ती मिळून आली नाही म्हणून त्यांनी तिचा घरात व आजुबाजूला शोध घेतला . परंतु ती त्यांना मिळून आली नसल्याने त्यांनी शेवगाव पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरूध्द फिर्याद दिली . त्यानुसार शेवगाव पोलिस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला . सदर गुन्हयाचा सुरूवातीस तपास पो.हे.कॉ. वीर यांनी केला . शेवगाव पोलिसांनी पिडीत मुलीचा तपास केला असता ती , आरोपी हा पिडीत मुलीला घेवून गणपती माथा वारजे येथे राहत असलेल्या ठिकाणाची माहिती मिळाली . त्यानंतर पोलिस व पिडीतेचे वडील हे घटनास्थळी पोहचले . तेथे शेवगाव पोलिसांनी वारजे पोलिसांच्या मदतीने पिडीत मुलगी व आरोपी यांना ताब्यात घेतले . त्यानंतर पिडीत मुलगी यांना घेवून शेवगाव पोलिस स्टेशन येथे आले . पोलिस स्टेशनला आल्यानंतर पिडीत मुलीने पोलिसांसमोर घटनेची माहिती सांगून जबाब दिला की , आरोपी निलेश राजु झेंडे पिडीतेस म्हणाला की , तुझे पेपर संपले आहेत आपण आता पळून जावून लग्न करू . त्यानंतर दिनांक ०५ . ०४.२०२२ रोजी आरोपी हा पिडीत मुलीस पळून घेवून पुणे येथे घेवून गेला . तिथे एका रूमवर तिच्या गळयात हार घालून घरातच लग्न केले . त्यानंतर २२ दिवसांनी पिडीतेला घेवून तो गणपती माथा वारजे येथे राहावयाय घेवून गेला . दोन्ही ठिकाणी राहत असताना , आरोपीने पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील तिचेशी बळजबरीने शारिरीक संबंध केले . पोलिस पिडीतेचा जबाब झाल्यानंतर सदर गुन्हयास वाढीव कलम लागल्याने पुढील तपास सहा . निरीक्षक आशिष प . शेळके यांनी करून मा . न्यायालयात दोषारोपपत्र मुदतीत दाखल केले .

या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले . यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी , पिडीत मुलीचे वडील , पंच साक्षीदार , वैद्यकीय अधिकारी , तपासी अधिकारी , वयासंदर्भात नगर परिषद शेवगावचे माहितगार इसम व मुख्याध्यापक यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . तसेच आलेला पुरावा व युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली . सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले . त्यांना पो.कॉ. विजय गावडे व पैरवी अधिकारी आर . व्ही . बोर्डे यांनी सहकार्य केले . अहमदनगर ता . ०८/०५/२०२३ 

 ( अॅड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )

 विशेष सरकारी वकील , 

अहमदनगर . 

मो . ९ ८५०८६०४११,

८२०८ ९९ ६७ ९ ५