स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ,प्रतिबंधित असलेला मांगुर मासा 4000 किलो , 29 लाख मुद्देमालासह जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ,प्रतिबंधित असलेला मांगुर मासा 4000 किलो , 29 लाख मुद्देमालासह जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ,प्रतिबंधित असलेला मांगुर मासा 4000 किलो , 29 लाख मुद्देमालासह जप्त

*प्रतिबंधित 4000 किलो मांगूर मासा जप्त, 29 लाख रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त*

राहुरी ता प्रती -    देवेंद्र शिंदे

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, प्रतिबंधित 4000 किलो मांगूर मासा जप्त, 29 लाख रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त. याबाबत वृत्त असे की, सोमनाथ घारगे साहेब, पोलिस अधीक्षक, आयला नगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आयला नगरमध्ये अवैध्य व्यवसायाची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलिस अमलदार राहुल दवारके, शहिद शेख, फुरकान शेख, राहुल ढोके, सुनील मालणकर, प्रशांत राठोड, सतीश भवर, चालक उमाकांत गावडे, उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करून, शिर्डी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये अवैध्य धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याकामी पथकास रवाना केले. नमूद पथक दिनांक 3 मार्च 2026 रोजी शिर्डी पोलिस ठाणे हद्दीमध्ये अवैध्य धंद्याची माहिती काढत असताना, पथकास गुप्त बातमीदारांमार्फत ट्रक नंबर डब्ल्यू वी 25 एम 50 23 यामध्ये केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले मांगूर मासे भरून नगर-मनमाड हायवे रोडवरील निमगाव बायपास रोड चौक येथून जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तत्काळ शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, पोलिस उपनिरीक्षक सागर काळे व पोलिस अमलदार यांना बोलावून निमगाव बायपास रोडवर सापळा रचून ट्रक क्रमांक डब्ल्यू वी 25 एम 50 23 हा ताब्यात घेऊन, त्यामध्ये खात्री केली असता, ट्रकच्या कॅबिनमध्ये प्रतिबंधित मांगूर मासे असल्याचे आढळून आले. ट्रक मध्ये मिळून आलेल्या इसमांना त्यांचे नाव, गाव विचारले असता, त्यांनी एम. डे, वय 36, राहणार बामणगाव, ताना, दत्त पुकर, जिल्हा बाराशद, पश्चिम बंगाल, असे सांगितले.

मदिया थाना, बदुडिया जिल्हा नॉर्थ, परगणा पश्चिम बंगाल येथील मृत्युंजय मुक्कोल विश्वास, वय 27, राहणार आब्रा थाना, आब्रा जिल्हा नॉर्थ, परगणा पश्चिम बंगाल, याने सांगितले. ताब्यात घेतलेल्या इसमाकडे, त्यांच्या ताब्यात मिळून आलेले मांगूर मासे कोठून आणले आहेत व कोणाकडे घेऊन जाणार, याबाबत विचारपूस करता, त्याने सदरचे मासे हे मिराज (पूर्ण नाव माहिती नाही) याने पश्चिम बंगाल येथून भरून दिले असून, ते खोपोली, मुंबई येथे भाई (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याकडे घेऊन जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर पथकाने प्रतिबंधित मांगूर माशांनी भरलेला ट्रक खात्रीसाठी शिर्डी पोलीस ठाणे येथे नेऊन, मत्स्य विकास अधिकारी, प्रतीक्षा सुधाकर पाटेकर यांच्याशी संपर्क साधून, ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रक मधील माशांची खात्री करण्याकामी संपर्क केला. प्रतीक्षा सुधाकर पाटेकर यांना दिनांक 3 मार्च 2026 रोजी शिर्डी पोलीस ठाणे येथे येऊन, नमूद ट्रक मधील माशांची खात्री केली असता, त्यामध्ये प्रतिबंधित मांगूर मासे असल्याचा अभिप्राय दिला. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडून 4,00,000 किमतीचे 400 kg प्रतिबंधित मांगूर मासे व 25,00,000 किमतीचा ट्रक असा एकूण 29,00,000 किमतीचा मुद्यमाल जप्त करून, प्रतिबंधित मासे कायदेशीर प्रक्रिया करून नष्ट करण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या इसमाविरुद्ध मत्स्य विकास अधिकारी प्रतीक्षा सुधाकर पाटेकर, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी ऐलानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, शिर्डी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 160/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223/275/3/5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे करीत आहे.