अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा ३ महिन्यानंतर शोध व सुटका आरोपी गजाआड राहुरी पोलिसांची कार्यवाही.

---------------------------------------------
राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर 1200/2024 BNS 137(2), प्रमाणे दिनांक 17 /11 /2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयामध्ये अपहरीत मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध्द नसतांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अथक परीश्रम घेवुन गुन्हयातील अपहरीत मुलीचा माग काढुन तिचा शोध घेतला असता ती आज रोजी तिची सुटका करून तीला राहुरी पोलीस स्टेशनला आणून तिचा सविस्तर जबाब नोंदवून सदर पीडितेस तिचे नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. गुन्ह्यात वाढीव कलम लावून आरोपी आदिनाथ गीताराम निशाने रा. खूडसरगाव तालुका राहुरी यास अटक करण्यात आली. आरोपीकडे विचारपूस करून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोकॉ. गणेश लिपने हे करत आहेत.
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील 55 मुलींचा शोध घेऊन व 6 अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. आरोपींना अटक करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक , मा.श्री.वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर , श्री. डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे, पोसई धर्मराज पाटील, पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ.अशोक शिंदे पोकॉ. गणेश लिपणे पोकॉ. आदिनाथ पाखरे, मपोकॉ. वृषाली कुसळकर नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन व पो.ना.संतोष दरेकर, नेमणुक अपर पोलीस अधीक्षक सो श्रीरामपुर मोबाईल सेल यांनी केलेलाआहे.