शिरेगावचे सुपुत्र पी.एस.आय प्रकाश बोर्डे यांचा स्वप्नपूर्ती सोहळा, त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी मेळावा न्यू इंग्लिश स्कूल शिरेगाव -खेडले परमानंद येथे संपन्न.
प्रतिनिधी- खेडले परमानंदनेवासा
न्यू इंग्लिश स्कूल शिरेगाव-खेडले परमानंद येथे पोलीस निरीक्षक प्रकाश बाळासाहेब बोर्डे यांचा स्वप्नपूर्ती सोहळा व माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.
या कार्यक्रमाला प्रमुख प्रमुख उपस्थिती लाभली सोनई पोलीस स्टेशनचे ए.पी.आय सचिन बागुल सर व स्थानिक गुन्हे शाखेचे मनोज गोसावी सर यांची खेडले परमानंद चे सरपंच राजेंद्र राजाळे, शाळा समितीचे अध्यक्ष लक्ष्मण प्रल्हाद जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नयुम इनामदार, ग्रामपंचायत सदस्य रमेश बनकर, अल्लू भाई इनामदार, ताहीर इनामदार, प्रल्हाद अंबिलवादे, छायाचित्रकार भाऊसाहेब राजाळे,पत्रकार गोविंद फुनगे , संभाजी शिंदे,कैलास गोसावी, अविनाश जाधव, पाथरे चे सरपंच,दोन्ही गावचे ज्येष्ठ मान्यवर असे अनेक ज्येष्ठ मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमासाठी होती
न्यू इंग्लिश स्कूल चे आजी-माजी शिक्षक वृंद यांचीही उपस्थिती होती यामध्ये मुख्याध्यापक व्ही एम दरंदले सर, बी आर जंगले सर, एस डी दरंदले सर, ए एस सोनवणे सर, आर जे दरंदले सर, पी जी बेल्हेकर सर, पी एम गडाख सर, एस डी नन्नवरे सर, आर बी नवगिरे सर, काळोखे सर, लांघे सर,हो मामा, माऊली तुवर असा शिक्षक व शिक्षकेत्तर स्टॉप त्याचप्रमाणे माजी शिक्षक विक्रम चौधरी सर, बी एस दरंदले सर, सोनवणे सर, असं शिक्षक परिवार हे या कार्यक्रमाची आकर्षण केंद्र होते
माजी विद्यार्थी अविनाश जाधव, किरण जाधव, ज्ञानेश्वर तुवर,राहुल बोर्डे, सागर बोर्डे, मोहन जाधव, राजू तुवर, प्रदीप तुवर, राहुल जाधव, अमोल भागवत, आझर इनामदार, अल्ताफ शेख, संजय बोर्डे, संदीप जाधव आसाम माजी विद्यार्थ्यांचा स स्नेहमेळावा या निमित्ताने येथे पार पडला
यावेळी बोलताना सोनई पोलिस स्टेशनचे ए.पी.आय सचिन बागुल सर यांनी आयपीएस परीक्षा त्याचप्रमाणे ग्राउंड लेवल ची परीक्षा कशा पद्धतीने व किती खडतर असती त्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात अपयश येऊनही निराशा मनी न धरता पुन्हा जोमाने प्रयत्न केल्यास नक्कीच यश पदरी पडते अशा शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोनई पोलीस स्टेशनची ए.पीआय सचिन बागुल सर, त्याच प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे मनोज गोसावी सर व नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोर्डे सर असा त्रिवेणी संगम असलेल्या तीन घस्ती एकाच व्यासपीठावर पाहून सर्व विद्यार्थी प्रभावित झाले
प्रकाश बोर्डे सर यांच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करताना ज्येष्ठ साहित्यकार त्याचप्रमाणे नेवासा तालुक्याचे भाग्यविधाते मा .खासदार यशवंतरावजी गडाख यांनी लिहिलेले अर्धविराम हे पुस्तक भेट देण्यात आले.यावेळी बोलताना माजी विद्यार्थी म्हणाले की यशवंतरावजी गडाख यांनी मुळा एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्यामुळेच. आज आम्हाला हे यशस्वी दिवस पाहण्यास भेटत आहे
त्यानंतर ज्यांच्यासाठी हा स्वप्नपूर्ती सोहळा होता अशा मुलाचे म्हणजे प्रकाश रावसाहेब बोरुडे पोलीस उपनिरीक्षक यांचे मनोगत त्यांनी सर्वांसमोर सादर केले. यावेळी बोलताना प्रकाश बोर्डे सर म्हणाले की अतिशय हालाखीच्या आणि गरिबीच्या परिस्थितीमध्ये माझ्या आई वडिलांनी माझे शिक्षण केले. वडील सकाळी घरातून मोलमजुरीसाठी बाहेर जायचे तर संध्याकाळी घरी यायचे त्याचप्रमाणे आई गुरांना गवत आणण्यासाठी दूर शेतात जायची त्यांच्या कष्टाला पाहून त्यांच्या कष्टाची जाणीव धरून मी माझे प्रयत्न सोडले नाही. कष्टाला तोडच नाही अविरतपणे केलेल्या कष्टाला फळ नक्कीच मिळते. परिस्थिती जेमतेम असल्याकारणाने कुठलेही एक्स्ट्रा क्लास न लावता केवळ अविरत मेहनत व अभ्यासाच्या जीवावर मी या यशाच्या शिखरावर यशाचा झेंडा लावू शकलो. जीवनात असेही क्षण आले की मी अपयशी झालो होतो, परंतु रडता- रडता आई ने डोळे पुसले व मला नवी उमेद दिली व आई-वडिलांच्या व गुरुजनांच्या आशीर्वादानेच मी हे स्वप्नपूर्ती सोहळ्याचे क्षण अनुभवत आहे. असे यावेळी बोलताना प्रकाश बोराडे यांनी सांगितले
मान्यवरांचे विचार विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकले
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आजी-माजी सर्व शिक्षक त्याचप्रमाणे मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनवणे सर यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक व्ही एम दरंदले सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री लांघै सर यांनी केले. या कार्यक्रमाची रूपरेषा शिरेगाव चे सुपुत्र राहुल बोर्डे यांनी आखली.