शेतकर्‍यांच्या वीज बील वसुली स्थगीतीला कार्यक्रम असे संबोधुन ना. तनपुरेंनी केली शेतकर्‍यांची थट्टा - प्रहार जनशक्तीचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पा.

शेतकर्‍यांच्या वीज बील वसुली स्थगीतीला कार्यक्रम असे संबोधुन ना. तनपुरेंनी केली शेतकर्‍यांची थट्टा - प्रहार जनशक्तीचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पा.

शेतकऱ्यांच्या वीज बील वसुली स्थगितीला कार्यक्रम असे संबोधून ना. तनपुरेंनी केली शेतकऱ्यांची थटा- सुरेशराव लांबे

राहुरी : गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे विद्युत रोहित्र बंद करून वीज जोडण्या तोडण्याचे काम चालू होते. कालच्या अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक होऊन सत्ताधाऱ्यांना वीज बील वसुली स्थगितीला भाग पाडले. ना. तनपुरेंकडुन प्रसिद्ध केल्या गेलेल्या बातम्यांत राज्यातील वीज तोडणी कार्यक्रम मागे घेण्यात आला, असे संबोधून ना. तनपुरेंनी शेतकऱ्यांची एक प्रकारे थटाच केली आहे असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी केला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी विविध प्रकारे अडचणीत असताना ऊर्जा विभागाकडून सतत वसुलीच्या नावाखाली राहुरी- नगर- पाथर्डी मतदार संघातील काही ठिकाणी एक महिना तर काही ठिकाणी जवळपास तीन महिने विद्युत रोहीत्र बंद ठेवून शेतकर्यांची पिळवणूक केली. या महावितरण सक्तीच्या वसुली विरोधात आम्ही मोर्चे आंदोलने केली व शेतकर्यांची असलेली प्रतिकूल परिस्थितीचा लेखाजोखा शासन व प्रशासनाच्या तोंडी व लेखी मांडण्याचा प्रयत्न केला. त्याला लोक प्रतिनिधी यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याविरोधात आम्ही रितसर निवेदन देऊन लोकशाही मार्गाने आंदोलने केली असता सत्तेचा गैरवापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन मोडित काढुन आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत आंदोलकांना पंधरा दिवस विनाकारण जेल मध्ये ठेवून अधिकार्यांमार्फत आंदोलकांना हिन अशी वागणूक देत जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारा आंदोलकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला गेला.

काल अधिवेशनात विरोधी पक्षाने आवाज उठविल्यानंतर ऊर्जामंत्र्यांनी तीन महिन्यांसाठी वीज तोडणी स्थगित करण्यात येईल अशी घोषणा केली. परंतु आज सत्तेत असलेले सत्तेत नसताना वीज बिल भरु नका, तेलंगण राज्य प्रमाणे शेतकऱ्यांना चोवीस तास विद्युत पुरवठा करावा अशा मागण्या करत होते. परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांना शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नाचा विसर पडला. त्यात एखादी अर्धी घोषणा केल्यानंतर ना. तनपुरेंसारख्या जबाबदार मंत्र्यांकडून प्रसिद्ध केलेल्या वीज तोडणी कार्यक्रम या शब्दप्रयोगाला उत्तर देतानी हा वीज तोडणी कार्यक्रम तुम्ही पुन्हा राबविल्यास येणार्या काळात मतदार संघातील सर्व सामान्य नागरिक व शेतकरी तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला आहे.