क्रांतिकारी भगतसिंग ब्रिगेड- सलग्न इन्कलाबी नौजवान सभेच्या वतीने शहिद दिनीक्रांतिवीरांना शहरातून मोटारसायकल रॅली काढून अभिवादन
श्रीरामपूर : दि. २३मार्च २०२३,क्रांतिकारी भगतसिंग ब्रिगेड सलग्न इन्कलाबी नौजवान सभेच्या वतीने शहीद दिनाच्या निमित्ताने क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढून क्रांतिकारी घोषणा देवून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. मोटारसायकल रॅलीची सुरुवात शहरातील बेलापूर रोड वरील वेशीपासून शहीद क्रांतीकारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोटारसायकल रॅली शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणच्या शहिदांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती दिलेल्या शहिदांच्या उद्दिष्टांची उजळणी करून ती पूर्ण झालीत की नाही यावर चिंतन करणे आवश्यक आहे. जर ती पूर्ण झाली नसतील तर त्यांच्या पूर्तीसाठी आपण काय योगदान देऊ शकतो ते ठरवून उद्दिष्टपूर्तीसाठी झटले पाहिजे. भांडवलशाही व मनुवादी अजूनही जनतेवर राज्य करत असून धर्मांध व भांडवलवादी सत्ता मोडीत काढणे हीच शहिदांना खरी आदरांजली ठरेल हा आशावाद रॅलीत व्यक्त करून महात्मा फुले व कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे स्मारकाजवळ मोटारसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला.
सदर रॅ
लीत जेष्ठ कामगार नेते कॉ. बाळासाहेब सुरुडे, जिल्हाध्यक्ष कॉ. श्रीकृष्ण बडाख, कॉ. शरद संसारे, कॉ. जीवन सुरुडे, कॉ. मदिना शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर कॉ.उत्तम माळी, कॉ.अरुण बर्डे, रामा काकडे, संतोष केदारी, किरण मते, प्रकाश भांड, विकास वाघ, राजेद्र भिंगारदिवे, किरण सोलंकी, योगेश अमोलिक, पंकज रंधे, सुभान पटेल, रामेश्वर जाधव, दत्तात्रय वक्ते, राहुल दाभाडे, सुयोग सस्कर, प्रकाश पवार, बाळासाहेब वाणी, रमेश शिंदे, अस्लम शेख, अश्रू बर्डे, संदीप गायकवाड, राहुल मेहत्रे, नितीन दरंदले, हसन शेख, मनोज जंगम, प्रतिक संसारे, सागर पवार, कालिदास हांडे, कमलेश दिवे, विक्रम कोर्डीवाल, प्रकाश बोर्डे, संतोष शेळके आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शहर पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त ठेवलेला होता.
BPS Livenews Reporter -Nikale Prakash, Shrirampur