गणेशवाडी लांडेवाडी शिवारातुन विज वाहक तारांची चोरी.सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गणेशवाडी लांडेवाडी शिवारातुन विज वाहक तारांची चोरी.सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी खेडले परमानंद ,नेवासा

गणेशवाडी लांडेवाडी शिवारातुन विज वाहक तारांची चोरी.

- दि. ३ सप्टेंबर रोजीच्या मध्य रात्री १२ वाजेच्या नंतर लांडेवाडी गणेशवाडी शिवारातुन चालू लघु वाहिनीच्या तारांची चोरी झाली असल्याची फिर्याद सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 

 पोलीस ठाण्यात सोनई विज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता जितेंद्र समाधान दामोदर यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांडेवाडी फिडरवरील बारव नं. २ डि पि चे लघुदाब वाहिनीचे ८ गाळे व शनि शिंगणापूर लोहकरे फिडरवरील तांदळे डि. पि. चे १० गाळे असे एकूण १८ लघु दाब वाहिनीचे १०८०० लांबीचे अल्युमीनियम ची तार असलेले गाळे गणेशवाडी लांडेवाडी शिवारातुन कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली असल्या बाबतची फिर्यादी नुसार अज्ञात आरोपी विरोधात गु. र. नं व कलम ४१५/२०२३ भादवि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना. तमनर हे करत आहेत. सकाळी लाईट सुरू झाल्यावर आपले शेती पंप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांच्या हि बाब लक्षात आली. चक्क चालू विज वाहिनीच्या ताराच चोरी गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.