७८ वा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहन कार्यक्रम डिग्रसच्या खंडोबाची वाडी शाळेत मोठया उत्सहात साजरी.

७८ वा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहन कार्यक्रम डिग्रसच्या खंडोबाची वाडी शाळेत मोठया उत्सहात साजरी.

१५ ऑगष्ट डिग्रस विद्यार्थ्याच्या उज्वल भविष्याची जडणघडण शाळेतच होते . शालेय जीवनात गुरुजनांकडून मिळालेले ज्ञान आणि संस्काराचे बाळकडू हेच आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी उपयुक्त ठरते असे प्रतिपादन सेवा निवृत्त पोलिस निरीक्षक सुधाकर वाघमारे यांनी केले .

     राहुरी तालुक्यातील डिग्रस ( खंडोबाची वाडी) येथिल जि.प.प्रा. शाळेत आयोजित ७८ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ते बोलत होते . कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी श्री कुंडलीक गावडे होते . व्यासपीठावर डिग्रस सोसायटीचे मुख्य सचिव नवनाथ मंडलीक भाजपाचे ज्ञानेश्वर भिंगारदे दै सार्वमत चे पत्रकार श्री राजेंद्र पवार - सेवा निवृत्त पोलीस कर्मचारी रमेश बेल्हेकर पत्रकार BPS Live NEWS अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री सचिन पवार रंभाजी गावडे तात्या राजू बेल्हेकर विष्णू पवार योहान पवार काशिनाथ गायके भारत म्हस्के उपस्थित होते .

      प्रारंभी सकाळी ७ वाजता गावात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली सेवानिवृत पोलिस निरीक्षक सुधाकर वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . यावेळी विद्यार्थ्यांनी कवायत भाषणे व सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले त्यांचे मान्यवरांनी कौतूक केले . प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.  

        याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सुनिता पवार उषा पवार आशा सेविका सारीका मंडलिक अंगणवाडी सेविका मंदा पवार सुरेखा मंडलीक रंभाताई कदम गोपीनाथ गावडे रावसाहेब पवार नाना ) राजेंद्र बर्डे रवि मोरे यांच्यासह विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय रोडे यांनी स्वागत प्रास्तविक केले तर उपस्थितांचे आभार शिक्षक सचिन दरेकर यांनी मानले

व कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना व पाहुण्यांना भोजनाचे आयोजन नवनाथ मंडलिक व आकाश राऊत यांनी केले.