महात्मा फुले कृषी विद्यापीठात अँटी रॅगिंग डे साजरा .
*महात्मा फुले कृषि विद्यापीठात अँटी रॅगींग डे साजरा*
*राहुरी विद्यापीठ, दि. 16 ऑगस्ट, 2024*
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयात कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कुलसचिव श्री. अरुण आनंदकर आणि पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी रॅगींग डे साजरा करण्यात आला. भारतातील विद्यापीठे व महाविद्यालयांत शिकणार्या विद्यार्थ्यांचा खेळीमेळीच्या वातावरणात व्यक्तिमत्व विकास व्हावा, शिक्षण घेत असताना त्यांना कोणत्याही शैक्षणिक अडचणी येवू नये यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने 12 ऑगस्ट, 2024 हा दिवस राष्ट्रीय अँटी रॅगिंग दिवस व भारतातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांत 12 ते 18 ऑगस्ट हा राष्ट्रीय अँटी रॅगिंग सप्ताह साजरा करण्याचे निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने आज अँटी रॅगींग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पदव्युत्तर महाविद्यालयाचे तांत्रिक अधिकारी डॉ. सुनील भणगे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विजय पाटील, वसतीगृहाचे मॉनीटर डॉ. दिलीप देवकर व प्रभारी सहाय्यक कुलसचिव श्री. किरण शेळके उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुनील भणगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या परिसरात शिस्तीचे पालन करून कोणतेही बेजबाबदार कृत्य न करण्यासाठी सूचित केले. येणार्या शैक्षणिक वर्षांत महाविद्यालयात नव्याने येणार्या विद्यार्थ्यांबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याविषयीही काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी रॅगिंग म्हणजे काय, अँटी रॅगिंग कायदा तयार करण्यामागची पार्श्वभूमी समजावून सांगितली व या सर्व माहितीचे पावर पॉइंटद्वारे सादरीकरण केले. याप्रसंगी डॉ. विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना अँटी रॅगींगची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. किरण शेळके यांनी केले. यावेळी वसतीगृहाचे मॉनीटर डॉ. राजेंद्र क्षिरसागर, पदव्युत्तर महाविद्यायलयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.