चांदा येथिल सोमेश्वर क्लास प्राथमिक शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना निरोप देतांना विद्यार्थ्यांना अश्रु अनावर.

नेवासा तालुक्यातील चांदा येथील सोमेश्वर क्लास प्राथमिक शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले .शिक्षकांप्रती असलेली आपल्या पाल्यांची आस्था पाहून पालकांचेही डोळे पाणावले. सोमेश्वर क्लास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र काटकर व शिक्षक राहुल बोरा यांची बदली झाली. त्यानिमित्ताने त्यांचा निरोप समारंभ तर नव्याने हजर झालेल्या शिक्षकांचा स्वागत समारंभ शनिवारी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रावसाहेब दहातोंडे होते. यावेळी बदली झालेल्या शिक्षकांच्या आठवर्णीना उजाळा देताना विद्यार्थ्यांना आश्रू अनावर झाले. यावेळी सर्वच जण भाऊक झाले होते.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी अंबाडे यांनी शिक्षकांनी शाळेसाठी केलेल लेखाजोखा मांडला. यावेळी ज्येष्ठ प्रा. एन.टी शिदे, श्यामराव पवार. संतोष. गाढवे, शहाजी धुमाळ, बाळासाहेब जावळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दिलीप पेहेरे, युवा नेते सागर जावळे .बाळासाहेब गुंदेचा. सुभाष गायकवाड. संजय जावळे सर. किरण दहातोंडे. काका जावळे. प्रमोद दहातोंडे, अरूण विधाटे. अविनाश कोथिंबिरे.अनिल दहातोंडे. विजय थिटे. किरण गायकवाड. राहुल अभंग. जगनाथ थिटे, अतुल गायकवाड़. अशोकराव झावरे व पालक वर्ग आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते .









