महिला साथीदारांच्या मदतीने साई सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल शिर्डी येथून मोटरसायकल चोरी करणारी आंतर जिल्हा टोळी जेरबंद,22,82,000 / - रुपये किंमतीच्या 30 मोटरसायकल जप्त .

महिला साथीदारांच्या मदतीने साई सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल शिर्डी येथून मोटरसायकल चोरी करणारी आंतर जिल्हा टोळी जेरबंद,22,82,000 / - रुपये किंमतीच्या 30 मोटरसायकल जप्त .

Delhi91 News चा खास वृत्तांत .

 

 

महिला साथीदारांचे मदतीने साईसुपर स्पेशालिटी हॉस्पीटल शिर्डी, येथुन मोटारसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, 22,82,000/- रुपये किमतीच्या 30 मोटारसायकल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

 

 

             अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरी करणारे चोरट्यांनी धुमाकुळ घातलेला होता. सदर मोटारसायकल चोरी करणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत राकेश ओला , पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/ दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना आदेश दिले होते.

               

  नमुद आदेशान्वये पोनि/ दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव, सफौ/बाळासाहेब मुळीक, भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/अतुल लोटके, पोना/रविंद्र कर्डीले, पोना/गणेश भिंगारदे, पोना/संदीप चव्हाण, पोना/संतोष खैरे, फुरकान शेख, विजय ठोंबरे, पोकॉ/बाळासाहेब गुंजाळ, रणजित जाधव, चालक पोहेकॉ/उमाकांत गावडे यांचे '' विशेष पोलीस पथक '' स्थापन करुन अहमदनगर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्ह्याची माहिती घेवुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते .

 

                    पोलीस पथक शिर्डी परिसरामधील चोरीस गेले मोटारसायकल ठिकाणाची पाहणी करुन तसेच पोलीस स्टेशन अभिलेखाची खात्री करता शिर्डी परिसरामधुन विशेषत: होंडा कंपनीच्या जास्त गाड्या चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्या दृष्टीने अशाप्रकारे गुन्हे करणारे अहमदनगर तसेच आजुबाजुचे जिल्ह्यामधील मोटारसायकल चोरीमधील आरोपीची माहिती काढत असतांना पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, 1) अन्वर मन्सुर शेख रा. पानमळा, कोपरगांव हा चोरीची मोटारसायकल घेवुन शिर्डी ते कोपरगांव जाणारे रोडवर सावळीविहीर फाटा या ठिकाणी थांबलेला आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस पथकाने सावळीविहीर परिसरामध्ये सापळा लावुन सदर इसमास ताब्यात घेतले. त्याचेकडे चोरीचे चोरीचे मोटारसायकल बाबत विचारपुस करता त्याने तसेच त्याचे इतर साथीदार नामे 2) बबन धोंडीराम मोगरे वय 48 वर्षे, रा. रावळगांव, ता. मालेगांव, 3) शाहीस्ता मन्वरअली सय्यद, रा. कोपरगांव, ता. कोपरगांव (फरार), 4) माया दिनेश चौधरी रा. कालिकानगर, शिर्डी, ता. राहाता (फरार), 5) अंकुश भावसिंग चव्हाण वय - 42 वर्षे, रा. रिठ्ठी मोहर्डा, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर यांचेसह अहमदनगर, नाशिक, मालेगांव, परभणी या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन मोटारसायकली चोरी केलेल्या असल्याची कबुली देवुन विविध ठिकाणावरुन 22,82,000/- रुपये किमतीच्या खालील एकुण 30 मोटारसायकल काढुन दिलेल्या आहेत.

 

                ताब्यात घेण्यात आलेले आरोपी 1) अन्वर मन्सुर शेख रा. पानमळा, कोपरगांव, जि. अहमदनगर, 2) बबन धोंडीराम मोगरे वय 48 वर्षे, रा. रावळगांव, ता. मालेगांव, जि. नाशिक, 3) अंकुश भावसिंग चव्हाण वय - 42 वर्षे, रा. रिठ्ठी मोहर्डा, कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर यांना शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 498/2022 या गुन्ह्याचे तपासकामी हजर करण्यात आले असुन पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे करीत आहे.

 

           आरोपी अन्वर मन्सुर शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द यापुर्वी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यामध्ये जबरी चोरी, चोरी असे एकुण 11 गुन्हे दाखल आहेत .आरोपी बबन धोंडीराम मोगरे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द यापुर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये चोरीचे एकुण 02 गुन्हे दाखल आहेत .

                 सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिर्डी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .