आसमानी संकटाने बर्फे कुटुंब झाले निराधार ,ग्रामस्थाच्या संकल्पनेतून कुटुंबाला दिला आर्थिक आधार.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे काही दिवसापूर्वी निसर्गाच्या अवकाळी संकटाने सविता राजू बर्फे या शेतमजूर महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. या घटनेने देडगाव परिसर नव्हे तर नेवासा तालुका हादरला होता.
आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस वण वण करणारी महिला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत, खडतर प्रवास जणू काही पाचिला पुजलेला .परंतु खंबीर पने उभी राहुन अगदी समाधानाने दोन घास लेकरांना भरवत अगदी आनंदी जीवन जगत होती. कुटुंबाची भक्कमपणे जबाबदारी सांभाळणारी ती महिला होती. अचानक काळाने घाला घातला व होत्याचं नव्हतं झालं घरामध्ये अचानक अंधार झाला .अंगावर वीज पडून त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. करती महिला घरातून गेल्याने घरावर दुःखाचे मोठे डोंगर कोसळले. त्या महिलेच्या पाश्चात मुलगा सनी बर्फे, मुलगी ,आई ,भाऊ संदिप, प्रदीप, भाऊजय असा मोठा परिवार आहे.
याच दुःखाचे गांभीर्य घेत देडगाव ग्रामस्थ व शिक्षण भूषण पुरस्कर्ते, ज्येष्ठ नागरिक बाजीराव पाटील मुंगसे (आण्णा) यांच्या संकल्पनेतून त्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे ठरवत ग्रामस्थांच्या सहकार्यातून दहा हजार रोख स्वरूपात रक्कम देत कुटुंबाला मानसिक व आर्थिक आधार देण्यात आला. व या पुढील काळातही दुःखांकित कुटुंबा मागे खंबीरपणे उभा राहू असे आश्वासन दिले.
यावेळी विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे ,भाऊसाहेब सोनवणे ,आदर्श शिक्षक भास्कर तांबे सर , फेयर बँक मेमोरियल चर्च चे अध्यक्ष श्रीकांतभाऊ हिवाळे ,विश्वास हिवाळे टेलर, चर्च चे कारभारी बाबुराव हिवाळे ,प्रदीप हिवाळे, शरद हिवाळे, नितीन हिवाळे , पत्रकार युनूस पठाण आदी मान्यवर या कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाले होते.