पंचगंगा सीड्स प्रा. लि आयोजित रब्बी सोयाबीन प्रात्यक्षिक संपन्न.

प्रतिनिधी:- नेवासा
पंचगंगा सीड्स प्रा.लि.कंपनी आयोजित रब्बी सोयाबीन प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम व शेतकरी मेळावाच्या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जलसंधारण मंत्री मा.ना.शंकरराव गडाख यांनी उपस्थित राहून मेळाव्यास उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्न वादी आहे. असे यावेळी बोलताना नामदार शंकरराव गडाख यांनी सांगितले.
यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत पाटील , जागतिक शेतीमाल बाजार भाव अभ्यासक पुणे दीपक चव्हाण ,पंचगंगा सीड्स चे प्रमुख प्रभाकर शिंदे, माजी आमदार पांडुरंग अभंग उपस्थित होते.